कळंब – कळंब तालुक्यात सावकाराच्या जाचास कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आण्णासाहेब केरबा काळे, रा. डोळा पिंपळगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी 18.12.2023 रोजी 06.18 वा. सु. डिकसळ ते पिंपळगाव रोडवर फॉरेस्टच्या गायरानजवळ विठ्ठल रघुनाथ बारगुले यांचे शेताचे कडेला लिंबाचे झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे-गोविंद बाबुराव शिंदे, रा. संभाजीनगर डिकसळ ता. कळंब जि. धाराशिव याचे कडून घेतलेल्या व्याजाचे पैसे देण्याचे कारणावरुन नमुद आरोपीने मयत नामे आण्णासाहेब काळे यांना व्याजाचे पैशावरुन वेळोवेळी मानसिक त्रास देवून व्याजाचे पैशावरुन मयताची पत्नी व मुलगी यांना घेवून जाईन अशी शिवीगाळ करुन धमकी दिल्यावरुन त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून नैराश्यातुन आण्णासाहेब काळे यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा आकाश आण्णासाहेब काळे, वय 22 वर्षे, रा. डोळा पिंपळगाव, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 28.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 306, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.