धाराशिव – पत्रकारांसाठी काम करणाऱ्या तसेच सर्वात जास्त पत्रकार नोंदणी असलेला व्हॉईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विंग धाराशिव जिल्ह्याच्या उर्वरित पदाधिकाऱ्यांना व्हॉइस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष सारिका महोत्रा यांच्या हस्ते नियुक्तीपत्र आज देण्यात आली.
धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात व्हाईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी धाराशिव जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांच्यासह राज्यातील प्रसिद्धीप्रमुख आणि प्रवक्ते यांचे राज्य समन्वयक रहीम शेख, मराठवाडा उपाध्यक्ष अमर चोंदे, महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष वैभव पारवे, धाराशिव तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, डिजिटल विंग चे कळंब तालुकाध्यक्ष अमोल रणदिवे, कळंब तालुका कार्याध्यक्ष रामरतन कांबळे, डिजीटल विंग धाराशिव चे तालुकाध्यक्ष इरफान शेख, असिफ मुलानी, शाहरुख सय्यद, कुंदन शिंदे, किरण कांबळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
निवड करण्यात आलेले पदाधिकारी
राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के तसेच डिजिटल विंग चे राज्याध्यक्ष जयपाल गायकवाड यांच्या सूचनेनुसार डिजिटल मीडिया विंगच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी सलीम पठाण, धाराशिव जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी किशोर माळी, जिल्हा कार्यावाहक पदी विशाल जगदाळे, जिल्हा प्रवक्ते पदी विश्वनाथ जगदाळे व कळंब तालुका कार्याध्यक्षपदी सलमान मुल्ला यांची निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले.