धाराशिव – धाराशिव लोकसभेची जागा शिवसेनेचीच असणार असा दावा शिवसेना उपनेते तथा धाराशिव लोकसभा संपर्कप्रमुख अनंतराव जाधव यांनी आज दि (13) रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केला
यावेळी शिवसेना उपनेते तथा धाराशिव लोकसभा संपर्कप्रमुख अनंतराव जाधव,धनंजय सावंत, सह संपर्कप्रमुख अनिल खोचरे,जिल्हाप्रमुख सुरज साळुंके,दत्ताण्णा साळुंखे,गौतम लटके,मोहन पनुरे,ईश्वर शिंदे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड, सह संपर्कप्रमुख अमरराजे कदम,अजित लाकाळ, यांची उपस्थिती होती.
गेली 25 वर्षापासून लोकसभेची जागा ही शिवसेनेकडेच असून येणाऱ्या लोकसभेतही ही जागा शिवसेना लढवणार असून मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो उमेदवार देतील त्यांना आम्ही निवडून आणण्याचा निर्धार केला आहे लोकसभा संपर्कप्रमुख जाधव यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये शिवदूत बूथ प्रमुख सदस्य नोंदणी याबाबत चर्चा करण्यात आली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांना पंधरा दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून सध्या तरी धाराशिव जिल्ह्याची परिस्थिती ही इतर जिल्ह्यापेक्षा टॉपवर असल्याचे त्यांनी सांगितले लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी महायुती 45 जागांवर निवडून येईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला घटक पक्षाने जरी उमेदवार जाहीर केला असेल तरीही धाराशिव ची जागा शिवसेनाच लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
गाव तिथे शाखा घर तिथे शिवसेना व महाराष्ट्र शासनाच्या योजना पोहोचविण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वच शिवसैनिक करीत आहेत त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत मतदारांचा कौल हा शिवसेनेचा बाजूने असणार असल्याचेही ते म्हणाले