• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, July 4, 2025
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न📰 धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या📰 धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन📰 खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा📰 ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

‘आता सरकारमध्ये जा! मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो,’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट

MH25News by MH25News
December 2, 2023
in महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
‘आता सरकारमध्ये जा! मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो,’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट
0
SHARES
0
VIEWS

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.’भाजपसोबत जाण्याबाबतच्या निर्णयाची माहिती मी,शरद पवार यांना दिली होती. शरद पवार यांनीच मला बोलावून सांगितले, की आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो,’ असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी कर्जत येथील विचार मंथन शिबिरात केला. भाजपची सोबत, सरकारमध्ये सहभाग व शरद पवार यांचा राजीनामा असे राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय नाट्याचे सर्व प्रयोग यावेळी अजित पवार यांनी उलगडले व मनातील अनेक गोष्टी बोलून देखील दाखवल्या.

‘प्रफुल्ल पटेल, मी, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, जयंत पाटील, अनिल देशमुख असे आम्ही १० ते १२ जण देवगिरीवर बैठकीसाठी होतो. राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत शरद पवार यांना थेट सांगण्याआधी सुप्रियाला माहिती दिली; तेव्हा तिने ‘मला सात ते दहा दिवस द्या, तेवढ्या वेळेत मी साहेबांना याबाबत राजी करते,’ असे सांगितले. आम्ही दहा दिवस थांबलो. त्यानंतर आम्ही थेट शरद पवार यांच्याकडे गेलो. त्यांनी सगळे ऐकले आणि ठीक आहे, असे म्हणाले,’ असा दावा अजित पवार यांनी भाषणात केला.

सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पुन्हा का बोलावले, असा सवाल अजित पवार यांच्याकडून करण्यात आला. ‘आमचा २ जुलैचा निर्णय शरद पवार यांना आवडला नव्हता, तर १५ दिवसांनी म्हणजे १७ जुलैला आम्हा सगळ्या मंत्र्यांना त्यांनी चव्हाण प्रतिष्ठानला कशासाठी बोलवले? आम्हाला सांगितले, की आधी मंत्री या. दुसऱ्या दिवशी आमदार या. काही आमदार घाबरत होते. मी आमदारांना घेऊन गेलो. सगळे बसले. तिसऱ्या दिवशी शरद पवार यांच्यासोबत राहिलेल्या नेत्यांशी चर्चा होणार होती. पुन्हा सगळं सुरळीत होणार, हे आम्हाला सांगितलं गेलं. यात वेळ गेला. सगळे पूर्ववत करण्याबाबतचे निरोप यायचे; पण निर्णय झालाच नाही. आम्हाला गाफील ठेवायचे होते का’, असा प्रश्न देखील अजित पवार यांनी केला.

‘पवारांनी १२ ऑगस्टला मला एका उद्योगपतीकडे बोलवले. त्यांनी सांगितले इथे जयंत पाटील, तुम्ही आणि मी एकत्र जेवायचे. निरोप आल्यानंतर मी गेलो. तेव्हा आमच्या निर्णयानंतर जवळपास दीड महिना उलटला होता. जर करायचेच नव्हते, तर कशासाठी हे सगळं केले, कुणासाठी केले’, असा सवाल त्यांनी केला. ‘आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच काम करतो ना? आम्ही चांगले सरकार चालवू शकत नाही का’, असा प्रश्न विचारताना, ‘मागे अडीच वर्षे कोण काय करत होते, हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे’, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

‘राजीनाम्यानंतर आंदोलन करायला त्यांनीच सांगितले’

‘पुस्तक प्रकाशनानंतर शरद पवार यांनी राजीनामा दिला. पण त्यानंतर शरद पवार यांनी आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाड यांना बोलवून घेतले. उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक, महिला व युवक पाहिजेत. त्यांनी तिथे आंदोलन करून मागणी करायची की राजीनामा परत घ्या, असे त्यांना पवार यांनी सांगितले; तेव्हा मला प्रश्न पडला, की राजीनामा परत घ्यायचा होता, तर मग दिलाच का? त्यानंतर पवार यांनी राजीनामा मागे घेतला. आम्हाला सांगितले, की सुप्रियाला माझ्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष करा. सगळ्या गोष्टी ठरल्या. सगळ्यांनी तयारी दाखवली. ही धरसोड वृत्ती, गाफील ठेवणे बरोबर नाही. हे मला पटत नाही. तुम्ही एकदा काय ते ठरवा, हेही सांगितले’, असे अजित पवार बोलताना म्हणाले. मात्र अजित पवार यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.त्यामुळे शरद पवार गटाकडून याबाबत काय स्पष्टीकरण दिले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
ग्रामीण

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न

July 2, 2025
धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
क्राइम

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

June 30, 2025
धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
अर्थव्यवस्था

धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

June 27, 2025
खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
आरोग्य

खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा

June 26, 2025
ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
क्राइम

ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले

June 16, 2025
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा
क्राइम

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

June 13, 2025

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
  • धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
  • धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
  • खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
  • ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!