महाविकास आघाडीचा लोकसभेच्या 48 पैकी 44 जागांसाठीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. चार जागांचा निर्णय चर्चेतून होणार आहे. महाविकास आघाडीच्या संभाव्य जागावाटपाची माहिती समोर आली आहे. या जागावाटपात सर्वाधिक जागा ठाकरे गटासाठी निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.देशात पुढच्या काही महिन्यांमध्ये मोठ्या राजकीय हालचाली घडण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीचं बिगूल वाजण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या गोटात देखील जोरदार हालचाली सुरु आहेत. देशातील महत्त्वाच्या विरोधी पक्षांची इंडिया आघाडीचं जागवाटपाबाबत चर्चा सुरु आहे. याच इंडिया आघाडीतल तीन प्रमुख पक्षांची महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्ष, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांचा समावेश आहे. या तीनही पक्षांनी आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्धार केलाय. विशेष म्हणजे या तीनही पक्षांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.माहितीनुसार,महाविकास आघाडीच्या जागावाटपात सर्वाधिक जागा ह्या ठाकरे गटासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. या जागावाटपात ठाकरे गटाला 19 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 13 ते 15 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच शरद पवार गटाला 10 ते 15 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यापैकी 44 मतदारसंघाच्या जागवाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. चार जागांवर सध्या चर्चा सुरु आहे. देशातील 5 राज्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या चार जागांबाबतचाही निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अंतिम जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.महाविकास आघाडीचं जागावाटप हे विभागानुसार जवळपास निश्चित झालंय. या संभाव्य जागावाटपाची आकडेवारी बाहेर येऊ लागली आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र अशा विभागानुसार जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीचं संभाव्य जागा वाटप
शिवसेना UBT : 19 – 21
काँग्रेस : 13 – 15
NCP : 10 – 11
राखीव : 02
आताच्या घडीला सूरु असलेली चर्चाएकूण जागा : 48 राखीव : 02 काँग्रेस : 13 शिवसेना UBT : 19 NCP : 10 चर्चेतून अंतिम निर्णय : 06
विदर्भ विभागात कोणता पक्ष कोणत्या जागेवर लढणार?
नागपूर : काँग्रेस
भंडारा गोंदिया : काँग्रेस किंवा NCP यांच्यात चर्चेतून ठरेल
वर्धा : काँग्रेस
चंद्रपूर : काँग्रेस
गडचिरोली : काँग्रेस
अमरावती : काँग्रेस आणि NCP यांच्यात चर्चेतून ठरेल
यवतमाळ – वाशिम : शिवसेना UBT
अकोला : वंचित बहुजन आघाडीसाठी (प्रकाश आंबेडकर) राखीव, ते न आल्यास काँग्रेस
बुलढाणा : शिवसेना UBT
रामेटक : शिवसेना UBT
मराठवाडा विभागात कोणता पक्ष कोणत्या जागेवर लढणार?
हिंगोली : NCP आणि शिवसेना UBT यांच्यात चर्चेतून ठरेल
नांदेड : काँग्रेस
लातूर : काँग्रेस
धाराशिव : शिवसेना UBT
संभाजी नगर : शिवसेना UBT
जालना : NCP आणि शिवसेना UBT यांच्यात चर्चेतून ठरेल
बीड : NCP
परभणी : शिवसेना UBT
उत्तर महाराष्ट्र विभागात कोणता पक्ष कोणत्या जागेवर लढणार?
धुळे : काँग्रेस
नंदुरबार : काँग्रेस
जळगाव : NCP
रावेर : NCP
दिंडोरी : NCP
नाशिक : शिवसेना UBT
शिर्डी : शिवसेना UBT
नगर : NCP
पश्चिम महाराष्ट्र विभागात कोणता पक्ष कोणत्या जागेवर लढणार?
पुणे : काँग्रेस
बारामती : NCP
माढा : NCP
सोलापूर : काँग्रेस
कोल्हापूर : शिवसेना UBT
सातारा : NCPसांगली : काँग्रेस आणि NCP चर्चेतून ठरेल
हातकणंगले : स्वाभिमानी शेतकरी संघटना (राजू शेट्टी) राखीव, ते न शक्य झाल्यास NCP
मावळ : शिवसेना UBT
शिरूर : NCP
कोकण विभागात कोणता पक्ष कोणत्या जागेवर लढणार?
रत्नागिरी सिंधुदुर्ग : शिवसेना UBT
रायगड : शिवसेना UBT
कल्याण : शिवसेना
भिवंडी : NCP
पालघर : शिवसेना UBT
ठाणे : शिवसेना UBT
मुंबई विभागात कोणता पक्ष कोणत्या जागेवर लढणार?
दक्षिण मुंबई : शिवसेना UBT
दक्षिण मध्य : शिवसेना UBT
ईशान्य मुंबई : शिवसेना UBT
उत्तर मध्य मुंबई : काँग्रेस
उत्तर पश्चिम मुंबई : शिवसेना UBT
उत्तर मुंबई : काँग्रेस