जालना – मराठा आरक्षणाच्याबाबत मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला २ जानेवारी पर्यंत मुदत दिली आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तर दुसऱ्या बाजूला कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून ओबीसी नेत्यांनी याचा विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी आपला पुन्हा महाराष्ट्र दौरा घोषित केला आहे.
मनोज जरांगे पाटील येत्या १५ नोव्हेंबरपासून महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरूवात करणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते गावागावात सभा घेणार असून एकूण ६ टप्प्यात हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात जरांगे पाटील हे ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहे. यातच १ डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचंही त्यांनी घोषित केलं आहे.
कसा असेल हा महाराष्ट्र दौरा?
15 नोव्हेंबर वाशी, परांडा करमाळा,16 नोव्हेंबर दौंड, मायनी, 17 नोव्हेंबर सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर आणि कराड, 18 नोव्हेंबर सातारा, वाई, रायगड, 19 नोव्हेंबर रायगड, पाचाड, महाड, मुळशी आळंदी, 20 नोव्हेंबर तुळापूर, पुणे, खराडी, चंदननगर, खालापूर, कल्याणा, 21 नोव्हेंबर ठाणे, पालघर, त्र्यंबकेश्वर, 22 नोव्हेंबर विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर, 23 नोव्हेंबर नेवासा, शेवगाव, बोधगाव.