धाराशिव – ड्रग्स प्रकरणानंतर आता तुळजापूरमध्ये मटका बुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून तुळजापुरात अवैधरित्या चालणाऱ्या मटका अड्डयावर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्वतः जाऊन छापा मारत ही कारवाई करत १ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त करत ३३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी लॉजवर असल्याची खबर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार कारवाईसाठी मोठा फौज-फाटा घेऊन पोलीस त्याठिकाणी गेले . मात्र तिथे ड्रग्स प्रकरणातील आरोपी नसून मटका बुकिंग व्यवसाय चालत असल्याचे लक्षात आल्यावर पोलीसांनी त्या हॉटेलचे दरवाजे तोडून ही कार्यवाही केली आहे.यात ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद गंगणेसह ड्रग्स प्रकरणात कारवाईची मागणी करणारे काँग्रेसचे अमोल कुथवळ, सचिन पाटील हे मटका बुकीचे मालक असल्याचे निष्पन्न झाले असून काँगेस पक्षाचे नेते अमोल कुतवळ, सचिन पाटील यांच्यासह अनेक बडे मासे गळाला लागले आहेत.हे आहेत ‘मटका किंग’चे मालक! पोलीसांनी ताब्यात घेत विक्रम नाईकवाडी याची कसून चौकशी केली असता, त्याने धक्कादायक माहिती दिली. हा मटका अड्डा आपण स्वतः व काँग्रेसचे अमोल माधवराव कुतवळ (रा. रावळ गल्ली), भाजपचे सचिन पाटील (रा. रावळ गल्ली), भाजपचे विनोद विलास गंगणे (रा. जिजामाता नगर) आणि भाजपचेच चैतन्य मोहनराव शिंदे (रा. शुक्रवार पेठ) हे सर्वजण मिळून चालवत असल्याची कबुली त्याने दिली. हे सर्वजण या मटका बुकीचे मालक असल्याचे स्पष्ट झाले आहे.