बीड – मुझे तोड़ लेना बनमाली,उस पथ पर देना तुम फेंक!
मातृ-भूमि पर शीश- चढ़ाने, जिस पथ पर जावें वीर अनेक!
या माखनलाल चतुर्वेदी यांच्या कवितेप्रमाणे देशप्रेम काय असते आणि देशाप्रती समर्पित भावना कशा असाव्यात, हे देशाच्या तिनही सैन्य दलांतील सैनिकांकडून शिकावे. देशासाठी सर्व काही पणाला लावून प्रत्येक युद्धात लढलेल्या माजी सैनिकांचे योगदान फार मोठे आहे. हे सैनिक देशाची शान तर आहेतच त्याचप्रमाणे आम्हा सर्वांचा ते अभिमान आहेत. देशाच्या या खऱ्या संपत्तीचा येणाऱ्या प्रत्येक पिढीने आदर, मानसन्मान ठेवलाच पाहिजे. माजी सैनिकांचे त्याग मौलाचे ठरते. सेवेत कार्य करत असताना घर परिवाराला मागे ठेवून राष्ट्र प्रथम म्हणत सर्वस्व पणाला लावून लढण्याचे धाडस सैनिक करतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने सैनिक हे देशाचा मुख्य कणा आहे आणि यासाठीच युवकांचे प्रेरणास्थान, विकासात्मक दूरदृष्टी असणारे युवा नेतृत्व श्रीमान अक्षय भैय्या मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त देशसेवा बजावलेल्या माजी सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा दिनांक 11, 12 व 13 मे घरोघरी जाऊन सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती तालमार्तंड प्रकाश बोरगावकर,अंबाजोगाई तालुका भाजपा पश्चिम मंडळ प्रमुख गोकुळ नाना कदम,प्रशांत अदनाक,संतोष (आबा) लोमटे, वैजनाथ ( भैय्या )देशमुख, बालाजी शेरेकर,शशिकांत (नाना ) गायकवाड,राणा चव्हाण, महेश लोंढाळ,महेश अंबाड,राजाभाऊ सोमवंशी, सुनील अडसूळ, शिरीष मुकडे यांनी दिली. युवकांचे हृदय स्थान आणि संवेदनशील युवा नेतृत्व श्रीमान अक्षय भैया मुंदडा यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम युद्धजन्य परिस्थितीमुळे रद्द करण्यात आले आहेत. परंतु देश सेवा करणाऱ्या माजी आणि आजी सैनिकांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी घरोघरी जाऊन माजी सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.