माजी खासदार रवींद्र गायकवाड
माजी आमदार ज्ञानराज चौगुले ,जिल्हाप्रमुख सुरज साळुंके,अजित पिंगळे यांच्या प्रयत्नाला यश
धाराशिव – राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण विकास कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत धाराशिव आणि कळंब नगरपरिषदांना एकूण १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नगरविकास विभागामार्फत दिनांक २० मार्च, २०२४ रोजी यासंबंधीचे शासन शुध्दीपत्रक जाहीर करण्यात आले.
माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज, चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, अजित पिंगळे यांच्या प्रयत्नाने निधी हा निधी मंजूर झाला आहे.
या योजनेअंतर्गत धाराशिव नगरपरिषदेला ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून कळंब नगरपरिषदेला ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून दोन्ही शहरांमधील रस्ते, नाली आणि सभागृहासारखी विविध विकासकामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
धाराशिव शहरातील कामांची यादी:
- विविध भागात सिमेंट रस्ते बांधणीचे ३९ कामे
- सिमेंट नाली बांधणीचे ४ कामे
- प्रभाग क्र. १९ मध्ये सभागृह बांधकाम
- भानु नगर मध्ये ओपन स्पेस विकसित करणे.
कळंब शहरातील विकास कामांची यादी:
- दक्षिण हनुमान मंदिरासमोर सभागृह बांधकाम
- सावरगाव (पु.) मधील हनुमान मंदिरासमोर लादीकरण
- महिला उद्यानात व्यायामाचे साहित्य आणि लहान मुलांसाठी खेळणी बसविणे
- पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानांतर्गत विकासकामे
- विविध भागांमध्ये लादीकरण
- धार्मिक स्थळांच्या परिसरात विकासकामे
- तालुका क्रीडा संकुल परिसरात लादीकरण
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात लादीकरण
- शहरातील धार्मिक मंदिरांसमोर विद्युत पोल उभारणे.