धाराशिव – परंडा मतदार संघातील रणजीत पाटील यांच्या उमेदवारीवरून पेच आणि गोंधळ निर्माण झाला होता. उमेदवारांच्या यादीमध्ये राहूल ज्ञानेश्वर पाटील असे नाव प्रसिद्ध झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये कन्फ्युजन ही कन्फ्युजन निर्माण झाले होते.
ज्ञानेश्रीर्वर पाटील यांच्या कार्यकर्त्यांने उमेदवारीची घोषणा होताच जल्लोष साजरा केला होता तर मोटे यांनी फेसबूक पोस्ट करत कार्यकर्त्यांना कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचे आवाहन केले होते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या 7संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी काही नावांमध्ये दुरुस्त होणार असल्याचे वक्तव्य करत कार्यकर्त्यांना अधिकच पेचात टाकले होते.
दरम्यान रणजित पाटील यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्का मोर्तब झाला असून उद्धव ठाकरे यांनी रणजीत पाटील यांना शिवसेना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे. रणजीत पाटील यांच्या नावावर शिक्का मुहूर्त झाल्याने माजी आमदार राहुल मोटे यांचा पत्ता कट झाला आहे. राहुल मोटे यांचा पत्ता कट झाल्याने मोटे आता काय भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.