• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, July 4, 2025
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न📰 धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या📰 धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन📰 खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा📰 ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव शहरासाठी तेरणा व रुईभर धरणातून पाणी आणण्यासाठी २३०.३२ कोटीस मान्यता

MH25News by MH25News
September 26, 2024
in Blog
0
धाराशिव  शहरासाठी तेरणा व रुईभर धरणातून पाणी आणण्यासाठी २३०.३२ कोटीस मान्यता
0
SHARES
91
VIEWS

शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांची माहिती

मुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री प्रा डॉ सावंत, आ राणा पाटील यांचे मानले आभार

धाराशिव – धाराशिव शहराला लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक असलेले पाणी उचलले जात नाही. त्यामुळे ५ ते‌ ६ दिवसाला पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी अमृत २ योजनेंतर्गत रुईभर व तेरणा धरणातून नव्याने सन २०४१ साठी योजना करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
तेरणा १६.८२, रुईभर ८.०५ व उजणी १८.०६ एमएलडी पाणी पुरवठा करण्यासाठी २३०.३२ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. त्यामुळे धाराशिव शहरास दररोज ५३.४६४ एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी केंद्र शासन ३३.३३ टक्के, महाराष्ट्र शासन ५१.६७ व स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगर परिषदेचा १५ टक्के असा अनुक्रमे ७६.८७ कोटी, ११९ कोटी व ३४.५५ कोटी रुपये असा एकूण २३०.३२ कोटी रुपयांच्या निधीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी मान्यता दिली आहे. यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा धाराशिव नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुरज साळुंके यांनी शासन दरबारी वारंवार पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यास यश आले असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख तथा धाराशिव नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुरज साळुंके यांनी दिली आहे. याबद्दल मुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री प्रा डॉ सावंत व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे साळुंके यांनी आभार मानले आहेत.

पुढे बोलताना साळुंके म्हणाले की, धाराशिव शहरास तेरणा धरण, रुईभर धरण व उजनी (भिमानगर) धरण येथून पाणी पुरवठा केला जात आहे. तेरणा धरणातून सन १९७० साली ४.८० एमएलडी (MLD) क्षमतेची योजना करण्यात आली होती. तर रुईभर धरणातून सन १९८८ साली ५.८० एमएलडी (MLD) क्षमतेची योजना करण्यात आली होती. तसेच युआयडीएसएसएमटी (UIDSSMT) योजनेंतर्गत उजनी धरणातून सन २०१३ साली ८ एमएलडी (MLD) क्षमतेची योजना करण्यात आली. त्यानंतर सन २०२० साली अमृत योजने अंतर्गत उजनी धरणावरील योजनेत वाढीव कामे करून १६ एमएलडी (MLD) क्षमता करण्यात आली. तर ही योजना राबवत असताना रुईभर व तेरणा धरणातील योजनेतून प्रत्येकी ५ एमएलडी (MLD) असे १० एमएलडी (MLD) क्षमता पाणी धाराशिव शहरास प्राप्त होईल असे गृहीत धरण्यात आले होते. परंतू रुईभर धरणातून येणारी पाईपलाईन एमएस (MS) ची होती. तर २०१२ व २०१८ च्या दुष्काळात बंद असल्यामुळे गंजून खराब झाली. सन २०१९ पासून ती योजना, पाईपलाईन व मोटारी खराब झाल्यामुळे बंद आहे. तसेच तेरणा धरणातून १९७० साली करण्यात आलेल्या योजनेची पाईपलाईन व मोटारीच्या वारंवार दुरुस्तीमुळे त्या योजनेतून २ एमएलडी (MLD) पाणी उचलले जात आहे. धाराशिव शहराची २०२४ ची लोकसंख्या अंदाजे १ लाख ४० हजार आहे. तर शहरास दररोज १८ एमएलडी (MLD) पाणी उपलब्ध होत असल्यामुळे ५ ते ६ दिवसाला धाराशिव शहरास पाणी पुरवठा होत आहे. त्यासाठी अमृत २ योजनेंतर्गत रुईभर व तेरणा धरणातून नव्याने सन २०४१ साठी योजना करण्याचे प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल धुळे येथील मानवसेवा कन्सल्टंट यांच्याकडून तयार करून घेण्यात आला व त्यास छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता यांच्याकडून पत्र क्र.जा.क्र. मुअमजीप्राछसं/तांश – ३ /२४८०/२०२४ दि.२९/७/२०२४ रोजी २४३,९८,५२६०० रुपयांच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता घेण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे या योजनेस अमृत २ मधून प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून दिल्यास धाराशिव शहराची २०४१ पर्यंतच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागणार असल्याचे साळुंके यांनी सांगितले. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल साळुंखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत व आमदार राणाजगजिसिंह पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत.

संबंधित बातम्या

Blog

मंदिर संस्थान कार्यालय येथे मद्यपान करून तोडफोड; पुजाऱ्यावर गुन्हा दाखल

May 14, 2025
आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका
Blog

आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका

November 13, 2024
आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार
Blog

आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार

November 1, 2024
पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन
Blog

पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

October 4, 2024
Blog

September 22, 2024
सावंतांच्या पुतण्याच्या घरासमोर गोळीबार; घटनेने एकच खळबळ
Blog

सावंतांच्या पुतण्याच्या घरासमोर गोळीबार; घटनेने एकच खळबळ

September 13, 2024

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
  • धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
  • धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
  • खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
  • ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!