वाशी – नवरात्र उत्सवाची तयारी सगळी जोरदार चालू आहे आई तुळजाभवानी व येडेश्वरी देवी चा प्रत्येक भक्त आपापल्या परीने आराधना करत असतो. कोणी जप-तप करत तर कोणी उपवास करत तर काही जण तुळजापूर किंवा येरमाळा येथून पायी ज्योत घेऊन जातात
परंतू ज्योत नेण्यामध्ये पुरुष मंडळींचे प्रमाण जास्त असते पण याला भूम येथील पारधी समाजाच्या महिला अपवाद ठरल्या आहेत. त्यांनी ऊन-वारा-पाऊस याची परवा न करता धावत-पळत तुळजापूर वरून भूम कडे ज्योत नेली. तुळजापूर हुन त्यांना रात्री निघाल्या नंतर तेरखेडा परिसरात पोहचलयला सकाळच्या 10 वाजल्या होत्या कालचा मुसळधार पाऊस होता तरी न डगमगता ज्योत इथं पर्यंत आणली. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत आम्ही भूम मध्ये पोहचू अशा त्यातील सुनीता काळे यांच्याशी सवांद साधला असता त्या म्हणाल्या की आमच्या मंडळाचे हे 7 वे वर्ष आहे

आम्ही सर्व महिलानी 7 वर्षांपूर्वी एकत्र येऊन सुरवात केली आमच्या मंडळात तश्या 50 महिला आहेत परंतु सध्या सोयाबीन काढणी चा सिझन असल्यामुळे ज्योत नेण्यासाठी आम्ही 20 जनच आलो आहोत रोजंदारी करून आईची सेवा करण्यात आम्ही धन्यता आणतो
समाजात अश्या नारी शक्ती पहायला कमीच भेटतात अश्या नारी शक्तीचा आदर्श घेण्याजोगा आहे