धाराशिव – येथे स्वनाथ फाउंडेशनच्या वतीने के.टी. पाटील नर्सिंग महाविद्यालयामध्ये अनाथ मुलांसाठी असलेल्या प्रति पालकत्व योजनेसंबंधी जनजागृती अभियान समारोह संपन्न झाला.प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . त्यानंतर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील ,स्वनाथ फाऊंडेशन प्रमुख सौ.श्रेया श्रीकांत भारतीय , सदस्या सारिका पन्हाळकर – मल्होत्रा तर जिल्हा बार कौन्सीलचे अध्यक्ष रवींद्र कदम , अमरसिंह देशमुख संस्था सचिव प्रेमाताई पाटील , प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील , सौ. मंजुळाताई पाटील यांच्या हस्ते मान्यवर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .
स्वनाथ फाऊंडेशन च्या सदस्या सौ.सारिका पन्हाळकर – मल्होत्रा यांनी प्रास्ताविकातून फाऊंडेशनचे उद्दिष्ट्ये सांगितले. तर स्वनाथ फाऊंडेशनच्या प्रमुख सौ. श्रेया श्रीकांत भारतीय यांनी आपल्या फाऊडेंशन ने केलेले कार्य आता भारतातील १७ राज्यात सुरु असून ही चळवळ व्यापक होण्यासाठी या जनजागृती अभियानाचा हेतू असल्याचे नमूद करून आपण सर्वांच्या मदतीने अनाथांना हक्काचे घरासोबत त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी समाजाने पुढे यावे , असे आवाहन या निमित्ताने त्यांनी केले , तर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक के. टी पाटील यांच्या कर्तृत्वास उजाळा देत या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वात मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या मराठी माध्यमाची शाळा म्हणून नावारूपाला आणणारे संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांचे त्यांनी कौतुक केले तर पुढील तिसरी पिढी आदित्यच्या रूपाने या संस्थेने केलेल्या घौडदौडीचे कौतुक केले.

यावेळी आदर्श शिक्षणl प्रसारक मंडळातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य , कर्मचारी व नागरिक महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते .
शेवटी सर्वांचे आभार प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील यांनी मानले .