धाराशिव – सर्वाधिक पत्रकारांची नोंद असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेमध्ये एज्युकेशन विंग कार्यरत आहे. हे विंग पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासंबंधी येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी स्थापित झाले असून ह्या विंग मार्फत राज्यात अनेक पत्रकार पाल्यांना शैक्षणिक मदत करून असून ह्या विंग चे महाराष्ट्र राज्यात एज्युकेशन सेलचे काम कसे चालते याची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य एज्युकेशन सेलचे अध्यक्ष आणि राज्य सरचिटणीस चेतन कात्रे यांना व्हॉईस ऑफ मीडिया तेलंगणा शाखेने निमंत्रीत केले होते. व्हॉईस ऑफ मीडिया तेलंगणा अध्यक्ष बी.संदेश आणि टीमने चेतन कात्रे यांचा सन्मान केला. तेलंगणामध्ये लवकरच एज्युकेशन सेलची सुरुवात होणार आहे.