• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, July 4, 2025
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न📰 धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या📰 धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन📰 खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा📰 ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

व्हाईस ऑफ मीडिया पत्रकारांच्या आयुष्यातील प्रकाश बीज – विजय वडेट्टीवार

MH25News by MH25News
November 18, 2023
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शैक्षणिक, संपादकीय
0
व्हाईस ऑफ मीडिया पत्रकारांच्या आयुष्यातील प्रकाश बीज – विजय वडेट्टीवार
0
SHARES
0
VIEWS

निकोप लोकशाही पत्रकारांनी टिकवावी : वडेट्टीवार

अधिवेशनाला पत्रकारांची उच्चांकी उपस्थिती
बारामती –

आतापर्यंत पत्रकारांच्या झालेल्या अधिवेशनाचे उपस्थितीतीचे उच्चांक या अधिवेशनाने मोडले आहेत. बदलत्या परिस्थितीत मिडियाचे स्वरुप देखील बदलले. चौथ्या स्तंभाची ताकद भरपूर आहे. पण दिलखुलास लिहिले गेले आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. लेखणीला मर्यादा आल्याचे जाणवते. कुणालाही झुकविण्याची ताकद व्हाॅईस ऑफ मीडियात आहे. व्हाईस ऑफ मीडिया पत्रकारांच्या आयुष्यातील प्रकाश बीज असल्याचे गौरवोद्गार विधान सभेचे विरोधी पक्षनेते
विजय वडेट्टीवार यांनी काढले.

पत्रकारांच्या न्याय हक्काचं व्यासपीठ असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाचा राज्याचे शिखर अधिवेशनाचे शानदार उद्घाटन ग.दि.मा. सभागृहात भरगच्च उपस्थितीत पार पडले.
उद्घाटन सत्राला अध्यक्ष म्हणून विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार लाभले. तर सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील , ज्येष्ठ पत्रकार खा.कुमार केतकर, गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील, ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे, महेंद्र पिसाळ, व्हाईस ऑफ मीडिया राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, (उपाध्यक्ष मंदार फणसे, ) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, माजी आमदार रामराव वडकुते, राज्य उपाध्यक्ष तथा अधिवेशन संयोजक अजितदादा कुंकूलोळ, बारामतीचे अध्यक्ष जितेंद्र जाधव व महेंद्र पिसाळ यांचे देखील कार्यक्रमाला उपस्थिती होती

यावेळी विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले,

“दर्पण म्हणजे जसाच्या तसा”, पण आता स्वरूप बदलल आहे. असे असले तरी या क्षेत्राची ताकद कायम आहे. कॉर्पोरेट हे क्षेत्र होत असल्याने बंधन वाढत आहेत. दिलखुलास लिहिता येत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे दर्पणकाराना अभिप्रेत आरश्यावर डाग मात्र तेवढे वाढले आहेत.
सुनेत्राताई येथे अधिवेशनाला आल्या. त्यामुळे अजित दादा पर्यंत पत्रकारांचा व्यथा, वेदना, मागण्या पोचतील. पत्रकारांची व्यथा मोठी आहे.

सूत्रांच्या अर्थाने होणारी सोयी ची पत्रकारिता बदलली पाहिजे. लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारिता मजबूत असली पाहिजे. निकोप लोकशाहीसाठी खरी पत्रकारिता व्हावी. लोकमान्य टिळकांच्या त्या काळच्या अग्रलेखा चा हवाला देत सरकारच डोकं ठिकाणावर आहे का हे विचारण्याचा धाडस देखील आता जगल पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
संध्याकाळी पाच वाजता सुद्धा मंत्रालय समोर उभी असलेली सामान्यांची मोठी रांग पहिली की खंत वाटते. तेव्हा प्रश्न संपले की वाढले याचा विचार होणे गरजेचे आहे. तेव्हा पत्रकारांनी सामान्यांच्या व्यथा वेचून मांडाव्यात असेही वडेट्टीवार म्हणाले.

सुनेत्रा वहिनी अन् अजित दादांचा संदेश

यावेळी सुनेत्रावहिनी पवार यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपुख्यमंत्री अजितदादा उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती दिली. दरम्यान अजितदादा यांचा शुभेच्छासह अपेक्षावजा संदेश त्यांनी वाचून दाखवला. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा.
देत बारामती निवड केल्याबद्दल धन्यवाद दिले. विकासाचे माॅडेलची पाहणी करावी. चौथा स्तंभ म्हणून बारामतीची पाहणी करावी, दुरुस्ती सुचवावी.
मिडीयाचा वेग प्रचंड वाढला आहे. सोशल मिडिया चा वापर अतिशय काळजीपूर्वक केला पाहिजे. माध्यमांनी विश्वासार्हतेबाबत गांभिर्याने काम करण्याची गरज असल्याचा संदेश दिला.

पत्रकारांच्या व्यथा सरकार दरबारी पोहचवू – खा.हेमंत पाटील

“सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे” या संत वचनाचा हवाला देत हिंगोलीचे खा.हेमंत पाटील यांनी अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या.
संदीप काळे यांच्या कामाचा आवाका मोठा आहे.
तीन वर्षांपासून त्यांनी पत्रकारांच्या समस्यासाठी लढा उभारला आहे. निःस्पृह बातम्या देण्यासाठी पत्रकाराना आर्थिक सक्षमता असणे गरजेचे आहे.
कुठल्याही जिल्ह्याला लाजवेल अशी बारामती आहे. ही विकासाची संकल्पना राज्यपातळीवर गेले पाहिजे या भूमिकेसाठी देखील पत्रकार अधिवेशन या ठिकाणी होत असल्याने वेगळा योग साधून आला आहे. व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचा उद्देश अतिशय प्रामाणिक आहे. पत्रकार सक्षम असेल तरच तो निस्पृहपणे काम करु शकतो. पत्रकारांच्या व्यथा सरकार दरबारी पोहचवू अशी ग्वाही देखील खा. पाटील यांनी दिली. यावेळी माजी आमदार वडकुते यांनी अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या.

व्हॉईस ऑफ मीडियाचे आता आंतरराष्ट्रीय पाऊल – संदीप काळे

व्हाईस ऑफ मीडिया चे आज ३७ हजार सदस्य आहेत. मागच्या दोन वर्षात देशभरात २८ हजार पत्रकारांचा विमा काढला. येत्या दीड वर्षात व्हाईस ऑफ मीडियाची सदस्य संख्या ३ लाखाच्या वर जाईल याची खात्री आहे. आज पासून आंतर राष्ट्रीय पातळीवर काम करण्याचे ध्येय घेऊन वाटचाल करायची असल्याचे व्हाईस ऑफ मीडिया राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी सांगीतले.
ते पुढे म्हणाले, आपण कृतीशिल कार्यक्रम राबवत असून संघटना अधिक मजबूत करावी लागणार आहे.
१५ टक्के पत्रकारांना २५ हजारावर पगार आहे. पण ८५ टक्के पत्रकार २० हजार रुपये खाली काम करतात. घराची सोय नाही. पाल्यांच्या शिक्षणासाठी परवड होते, हे वास्तव आहे.
तीन वर्षांपूर्वी व्हाईस ऑफ मीडिया च्या झेंड्याखाली एकत्र आलो. आजपासून आंतरराष्ट्रीय संघटना करीत आहेत. सकारात्मक पत्रकारिता रुजविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. जोडधंदा नसेल तर पत्रकारांना अडचणी आहेत. घरे, आरोग्य, मुलांचे शिक्षण आदी प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला असून सर्वांना अधिवेशनातून प्रेरणा मिळेल. आपल्या कामाच्या बळावर संघटनेने नांव मिळविले. विकासाच्या व्हिजन मुळे अधिवेशनासाठी बारामतीची निवड केली असल्याचे आवर्जून सांगितले.

पत्रकारांच्या आर्थिक उन्नतीसाठी कल्याणकारी मंडळ द्यावे – अनिल म्हस्के

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी प्रास्ताविकात
अधिवेशनाच्या आयोजनामागील भूमिका सांगताना
पत्रकारांची अवस्था मांडली. ते म्हणाले,
चौथास्तंभ हा केवळ नावापुरता असल्याचे वास्तव सांगीतले. एका बाजूला पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आपण म्हणतो परंतु सुरुवातीला असलेल्या कायदेमंडळ, न्यायमंडळ आणि प्रशासन या तीन आधारस्तंभ घटनात्मक अधिकार आहेत. पण आमच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना असा कुठलाही व्यापक अधिकार नाही किंवा त्यांच्या हिताचा पाहिजे तेवढा विचार झालेला नाही.
राज्यातील पत्रकारांची पेन्शन योजना देखील नावालाच आहे. केवळ १५० पत्रकारांना पेन्शन सुरू आहे. पत्रकारितेमध्ये व्यावसायिक पणा आल्यापासून पत्रकारांची हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही दूर करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर पत्रकार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात यावी. सरसकट अधिस्वीकृती देण्यात यावी, साप्ताहिकांवरील अन्याय दूर करावा, अशा विविध मागण्या मांडल्या. पत्रकारांच्या -आरोग्य, शिक्षण, निवास, तंत्रज्ञान, निवृत्तीनंतर काय ? या पंचसूत्रीनुसार व्हाईस ऑफ मीडिया वाहून घेऊन काम करत असल्याचे म्हटले.

पत्रकारितेचा “व्हाईस” संघटना बनली – चंद्रमोहन पुप्पाला

व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की,
इंग्रजी पत्रकारितेत सुरुवात केली.मग हिंदी आणि मराठीत काम केले, असे सांगून तीनही भाषेत सवांद साधला. पत्रकारांच्या आणि पत्रकारितेतील समस्या, उणीवा शासन कर्त्यापुढे मांडणारे राष्ट्रव्यापी संघटन
व्हाईस ऑफ मीडियामुळे उभ राहिले आहे. ही बाब अभिमानाने सांगण्यासारखी आहे. पत्रकारांच्या विविध अंगांनी प्रत्येक घटकांसाठी यापूर्वी कधीही झाले नव्हते, ते काम व्हाईस ऑफ मीडियाने केले असल्याचेही ते म्हणाले.

प्रारंभी दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर चित्रफितीच्या ( एव्ही) माध्यमातून व्हाईस ऑफ मीडियाच्या कार्याचा आढावा सादर करण्यात आला. दरम्यान बारामती विकास मॉडेलची देखील एव्ही च्या माध्यमातून पत्रकारांना ओळख करून देण्यात आली. उद्योग, शिक्षण, पर्यटन, सहकार आणि विविध क्षेत्रात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कल्पकतेतून झालेला सक्षम विकास चित्रफितीतून राज्यातील पत्रकारांनी अनुभवला.

हिंगोलीतील घरासाठी ५ लाखांचा निधी

प्रत्यक जिल्ह्यातील पत्रकारांसाठी घरे बांधून देण्यात यावे यांसाठी व्हाईस ऑफ मीडियाने पुढाकार घेतला आहे. हिंगोलीच्या पत्रकारांसाठी घरे बांधून देण्यासाठी खा. हेमंत पाटील व हिंगोलीच्या पालकमंत्री अब्दुल सत्तर यांनी ५ लाख रुपयांचा निधी दिला. सदर चेक सुनेत्राताई पवार, खा.हेमंत पाटील यांच्या हस्ते हिंगोलीच्या व्हाईस ऑफ मीडियाच्या टीम कडे सुपूर्द करण्यात आला.
सूत्रसंचालन महिलाविंग च्या राज्याच्या कार्याध्यक्ष फराह खान यांनी केले.

संबंधित बातम्या

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
ग्रामीण

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न

July 2, 2025
धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
क्राइम

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

June 30, 2025
धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
अर्थव्यवस्था

धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

June 27, 2025
खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
आरोग्य

खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा

June 26, 2025
ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
क्राइम

ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले

June 16, 2025
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा
क्राइम

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

June 13, 2025

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
  • धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
  • धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
  • खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
  • ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!