वाशी – तालुक्यातील सिएससी केंद्र चालकांसाठी जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात मिशन कर्मयोगी अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले. सिएससी केंद्रा मार्फत शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. शासनाने नवीन जाहीर केलेल्या आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी, विश्वकर्मा योजना अंतर्गत लाभार्थी नोंदणी, ग्रामीण ई स्टोअर व मायक्रो बचत योजना तसेच विविध योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी केंद्र चालकांना सिएससी जिल्हा व्यवस्थापक लतिफ शेख यांनी मार्गदर्शन केले. तसेच ग्राहकांप्रती सेवाभाव, वागणूक, बोलणे, कसे असावे याबाबत सिएससी चे वरिष्ठ अधिकारी सूरज माकणे यांनी मार्गदर्शन करुन प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणादरम्यान आपले सरकार सेवा केंद्र तालुका व्यवस्थापक सत्यवान मेटे यांच्यासह तालुक्यातील केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. प्रशिक्षणासाठी गटविकास अधिकारी नलावडे एस.एस.सरांचे मोलाचे सहकार्य लाभले.