धाराशिव – वेश्या व्यवसाय प्रकरणी अटकेत असलेल्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा युवक प्रदेशाध्यक्ष नितीन शेरखाने याने लॉज भाड्याने दिल्याचा बनाव उघडकीस आल्याने त्याचा जमीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे शेरखाने याचा जिल्हा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
धाराशिव शहरातील ‘निसर्ग गारवा लॉज’ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वेश्या व्यवसाय सुरु होता. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानंतर दि. २१ डिसेंबर रोजी पोलीसांनी या लॉजवर छापा मारला असता, चार महिलांसह काही ग्राहक मिळून आले होते.याप्रकरणी लॉजमालक नितीन शेरखाने यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर शेरखाने फरार झाला होता. पोलीसांनी अखेर शेरखाने याच्या मागील रविवारी पहाटे मुसक्या आवळल्या होत्या. त्यास सुट्टीच्या कोर्टात उभे करण्यात आले असता, तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली होती. तीन दिवसाची पोलीस कस्टडी संपताच, पुन्हा कोर्टात उभे करण्यात आले असता, जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती.
न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच, नितीन शेरखाने याने वकील ऍड. अमोल वरुडकर यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा वर सत्र न्यायाधीश व्ही.जी, मोहिते यांच्यासमोर झाली. यावेळी ऍड. अमोल वरुडकर यांनी जोरदार युक्तिवाद केला. निसर्ग गारवा लॉज हे नितीन शेरखाने याच्या मालकीचे असले तरी मॅनेजर दिलीप रामदास आडसुळे यास ५ लाख डिपॉझिट आणि दरमहा ७० हजार रुपये भाड्याने चालवण्यास देण्यात आल्याचे सांगितले आणि तसा भाडेपत्र करार दाखवला, पण बँक स्टेटमेंट दिले नाही. तसेच लॉजवर आलेले पैसे स्कॅन केल्यानंतर नितीन शेरखाने याच्या बँक खात्यावर जात असल्याचा पुरावा पोलिसांनी न्यायालयात दिला. त्यामुळे भाडेतत्वावर लॉज चालवण्यास देण्यात आल्याचा शेरखाने याचा बनाव न्यायाधीश मोहिते यांच्या लक्षात आला.
तसेच वेश्या जमनसाठी आलेल्या ग्राहकाकडून किमान एक हजार पाचशे रुपये घेतले जात होते. पैकी पीडित महिलेला ६०० रुपये, दलाल बालाजी गवळी यास ३०० आणि उर्वरित रक्कम शेरखाने यास मिळत होती. तसेच मॅनेजर मॅनेजर दिलीप रामदास आडसुळे यास लॉजचा मॅनेजर म्हणून मासिक १२ हजार पगार होता तसेच ग्राहकाकडून टीप मिळत होती. याचे पुरावेच पोलिसांनी सादर केल्याने अतिरिक्त जिल्हा वर सत्र न्यायाधीश व्ही.जी, मोहिते यांनी नितीन शेरखाने याचा जामीन फेटाळून लावला.
‘निसर्ग गारवा लॉज मध्ये सेक्सची उब घेण्यासाठी आजवर किती महिला आल्या, कोण ग्राहक आले, त्यांच्याकडून किती रक्कम घेतली याचा तपास पोलीस करीत असून, अनेकांचे धाबे दणाणले आहेत.