मुंबई – आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या संतप्त आणि अस्वस्थ वातावरणामुळे तात्पुरती स्थगित करण्यात आलेली युवा संघर्ष यात्रा पुन्हा सुरू होणार असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी असलेल्या चौंडी येथून युवा संघर्ष यात्रा सुरू होणात असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं आहे.
राज्यातील तरूणांच्या प्रश्नांसाठी रोहित पवारांनी दसऱ्याच्या दिवशी युवा संघर्ष यात्रेला सुरूवात केली होती. या युवा संघर्ष यात्रेचा शेवट नागपूर येथे होणार आहे. परंतु मध्यंतरी मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला होता. राजकीय नेत्यांना गावकऱ्यांनी गावबंदी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी ही युवा यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
(हे देखील वाचा – एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड)
दरम्यान, युवा संघर्ष यात्रेच्या अगोदर रोहित पवार यांनी छोटाखानी दौरा आखला आहे. १२ ऑक्टोंबरला रोहित पवार चौंडी, अंबड, आणि सिंदखेडराजा येथे दिपोत्सव कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर १४ आक्टोंबर ते बीड येथील मराठा आंदोलकांनी जाळलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात पाडवा साजरा करणार आहेत. त्यानंतर १५ ऑक्टोंबरला पारनेर-मंगळगंगा देवी दर्शन आणि भाऊबीज तर १७ तारखेला चौंडी येथून युवा संघर्ष यात्रेची पुन्हा सुरूवात करणार आहेत