नवी दिल्ली – आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्वाचा आहे.घड्याळ हे चिन्ह व राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? याबाबत महत्वपूर्ण सुनावणी आज होणार आहे. आज 4 वाजता दिल्लीत सुनावणीला सुरुवात होणार आहे. या आधीच्या सुनावणीत अजित पवार गटावर बोगस प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप शरद पवार यांच्या गटाकडून युक्तिवादावेळी करण्यात आला होता. अजित पवार गटाचा युक्तिवाद आता पूर्ण झाला. शरद पवार गटाकडून आज युक्तिवाद होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आहे. आज 4 वाजता दिल्लीत सुनावणीला सुरुवात होणार आहे.
शरद पवार पुण्याहून दिल्लीकडे रवाना
भाजपसोबत जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी घेतला. राष्ट्रवादीच्या एका गटाने अजित पवार यांच्यासोबत भाजपला पाठिंबा देत युती सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावर अजित पवार गटाने काहीच दिवसातच शिंदे गटाप्रमाणे दावा सांगितला. त्यानंतर आता या प्रकरणी निवडणूक आयोगात सुनावणी होत आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसह राजकीय वर्तुळाचं या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे.