वनडे विश्वचषक 2023 मधील अखेरचा साखळी सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्या दरम्यान झाला. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने एकतर्फी विजय
(हे देखील वाचा – रोहित पवारांची संघर्ष यात्रा पुन्हा सुरू होणार)
मिळवला.भारतीय फलंदाजांनी विजयासाठी दिलेल्या 411 धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ केवळ 250 पर्यंत मजल मारू शकला. भारताने 160 धावांनी विजय मिळवत साखळी फेरीत अजिंक्य राहण्याचा कारनामा केला.