धाराशिव – 2024 लोकसभा च्या निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले असून त्या बाबत हालचाली सुरू केल्या असून जागेवर प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे राजकीय पक्ष आपला दावा सांगू लागला आहे.
धाराशिव लोकसभेसाठी देखील भाजप,शिवसेना दोन्ही गट, राष्ट्रवादी दोन्ही गट यांच्याकडून धाराशिव च्या जागेवर दावा करण्यात आला आहे. विद्यमान खासदार ठाकरे गटाचे ओम राजेनिंबाळकर हे आहेत.ह्या आधी सद्या भाजपमध्ये असलेले राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना ओम राजेनिंबाळकर यांच्याविरोधात दंड थोपटत मैदानात उतरले होते मात्र ओम राजेनिंबाळकर यांनी राणा पाटील यांच्या मोठ्या फरकाने पराभव करत विजयी गुलाल उधळला होता.
धाराशिव जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो,मात्र आता शिवसेनेत फूट पडून दोन गट तयार झाले आहेत.काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे त्या वेळेस मूळ शिवसेनेत असलेले माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी देखील पत्रकार परिषद धाराशिव च्या जागेवर दावा सांगितला आहे.तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटाच्या बाजूने देखील धाराशिव लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे.
काही दिवसांपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाराशिव लोकसभेचा आढावा घेतला असून त्यांच्याकडून देखील हा मतदार संघ आपलाच असेल असे म्हणत दावा ठोकला आहे.मात्र भाजप,शिंदे गट,अजित पवार गट यांची महायुती झाल्याने ही जागा नेमकी कोणता पक्ष लढवणार असा पेच सुरू असताना भाजपवासी झालेले राणा पाटील यांना राष्ट्रवादी च्या अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर परत एकदा संधी मिळू शकते अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे. मागील आठवड्यात अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाने तर लोकसभेच्या उमेद्वाराचे नाव देखील जाहीर केले होते. अंबादास दानवे यांनी विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर हेच आमचे उमेदवार असतील असे त्यांनी जाहीर केले आहे. अजित पवार गटाच्या उमेदवाराला जर धाराशिव लोकसभेचे तिकीट मिळाले तर ओम राजेनिंबाळकर यांना ही निवडणूक कितपत जड जाईल किंवा राणा जगजितसिंह पाटील उभे राहिले तर दोघांमध्ये कोण वरचढ ठरेल हे याचा अंदाज दोघांमधील पूर्वी झालेल्या लढतीमधून लावता येईल.असे असले तरी अद्याप महायुती मधून अधिकृतरित्या उमेदवाराचे नाव जाहीर झाले नसून तुळजापूर चे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील हे ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवणार की ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवणार, की भाजप यावेळी एखाद्या ‘धक्कातंत्राचा’ वापर करणार हे येणाऱ्या काही दिवसांतच समजेल.