धाराशिव – तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या ‘निसर्ग गारवा लॉज मध्ये मागील अनेक दिवसांपासून वेश्या व्यवसाय सुरु होता. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानंतर दि. २१ डिसेंबर रोजी पोलीसांनी या लॉजवर छापा मारला असता, चार महिलांसह काही ग्राहक मिळून आले होते. याप्रकरणी लॉजमालक नितीन शेरखाने यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर शेरखाने फरार झाला होता. पोलिसांनी अखेर शेरखाने याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नितीन शेरखाने हा शिवसेना (उबाठा) सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या जवळचा मानला जातो, सेनेच्या (उबाठा) प्रत्येक कार्यक्रम व आंदोलनात तो खांद्याला खांदा लावून सहभागी असायचा. तसेच शेरखाने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा युवक प्रदेशाध्यक्ष आहे.त्याची पत्नी जिल्हा परिषद सदस्य होत्या. शेरखाने यांच्यावर वेश्या व्यवसाय प्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटक झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
धाराशिव शहरात तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या ‘निसर्ग गारवा लॉज’ येथे लॉज चालक- व्यवस्थापक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पोलीस पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन नमूद लॉजवर दि. 21.12.2023 रोजी 16.05 वा. सु. छापा टाकला असता लॉज मध्ये चार महिला (नाव- गाव गोपनीय) आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता हॉटेल चालक दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे,रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव,दलाल- बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, हे दोघेजण नमुद लॉजचे मालक 1)नितीन रोहीदास शेरखाने रा. धाराशिव यांच्या सांगण्यावरुन त्या महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करत होते व नमुद तिघेजण त्यावर स्वत:ची उपजिवीका करत आहेत असे समजले.
यावरुन पथकाने लॉज मॅनेजर नामे- 1) दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे, रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव, दलाल-2) बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, यांना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोन, नोंदीचे रजिस्टर, ॲटोरिक्षा क्र एमएच 09 जे 8134, रोख रक्कम 16,130 व निरोधची पाकीटे असा एकुण 71,130 ₹ माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या महिलांची सुटका करुन लॉजमालक नितीन रेाहीदास शेरखाने रा. धाराशिव, लॉज मॅनेजर दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे,रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव, दलाल- बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, यांचेविरुध्द गुरनं 352/2023 भा.दं.वि. सं. कलम- 370, 370 (अ) (2), 34 सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4, 5 अन्वये धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दि. 21.12.2023 रोजी गुन्हा नोंदवला आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर नितीन शेरखाने फरार झाला होता. पोलिसांनी रविवारी पहाटे त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे.