परंडा – परंडा तालुक्यातील खासापुरी येथील तलाठयास मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाण प्रकरणी आरोपी योगेश परमेश्वर मेटकरी, रा. संगमपार्क परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 20.12.2023 रोजी 12.25 वाजण्याच्या सुमारास विकास मोहन नागटिळक, वय 30वर्षे, व्यवसाय- तलाठी सज्जा खासापुरी रा. खासापुरी ता. परंडा जि. धाराशिव हे त्यांचे कार्यालयात शासकीय कामकाज करत असताना आरोपी हा आला व दोन वर्षापुर्वी केलेल्या कारवाईचा राग मनात धरुन तु दोन वर्षापुर्वी माझा वाळूचा ट्रॅक्टर पकडला होता, तालुक्यामध्ये राजरोसपणे वाळुची चोरी चालू आहे तुला दिसत नाही का? असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. व फिर्यादीस ऑफीसच्या बाहेर आणुन ढकलून देवून जखमी करुन शासकिय कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विकास नागटिळक यांनी दि.20.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 353, 323, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.