• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Monday, March 30, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

..तर दादागिरीनेच उत्तर देऊ; ओबीसी एल्गार महामेळाव्यातून भुजबळांचा जरांगेंना इशारा

MH25News by MH25News
December 9, 2023
in महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
..तर दादागिरीनेच उत्तर देऊ; ओबीसी एल्गार महामेळाव्यातून भुजबळांचा जरांगेंना इशारा
0
SHARES
0
VIEWS

इंदापूर – राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची तोफ पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर शरसंधान साधत थेट इशारा दिला. छगन भुजबळ यांनी ओबीसीच्या मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. यापुढे तुम्ही दादागिरी केली तर आम्ही तुला दादागिरीनेच उत्तर देऊ, असा इशाराच छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तसेच यावेळी भुजबळ यांनी पोलिसांनाही सावध राहण्याचा सल्ला दिला. तुम्ही कारवाई का करत नाही. उद्या प्रकरण हाताबाहेर गेले तर तुम्ही हातात बंदुका घेऊन केवळ बघ्याची भूमिका घेणार आहात का? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

इंदापूरमध्ये ओबीसी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मी काही बोललो तर अनेक विचारवंत बोलायला लागतात. महाराष्ट्रात अशांततेचे वातावरण पसवरले जाते. दोन जातीत भांडणे लावली जात असल्याचे सांगण्यात येते. ते जरांगे १५ दिवसांपासून फिरत आहेत. सकाळपासून त्याची मिटिंग सुरू होते. आपली मिटिंग रात्री १० वाजता बंद होते. त्यांची मिटिंग रात्री १२ ला, रात्री १ ला, रात्री दोनला. त्यांना परवानगी आहे की नाही माहीत नाही. पोलीसही कारवाई करत नाही. ते म्हणेल तो कायदा. कायदा फक्त तुम्हाला आणि आम्हाला? त्यांनी काही बोललं तरी त्याच्या बातम्या येणार. आपण गप्प बसणार. १५ दिवसाने काही बोलले की त्यांचे लगेच सुरू. मी फक्त १५ दिवसाने बोलतो. पण एक सौ सुनार की एक लोहार की. त्यामुळे थोडे बोलावे लागते. सर्वच ऐकून घेण्याची आम्हाला सवय नाही. इथे कुणालाच नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.

मला सांगा या राज्यात अशांतता कोण माजवत आहे? आम्ही माजवतोय? छगन भुजबळ म्हणाले का तलवारी घेऊ, कुऱ्हाडी घेऊ? ते यवतमाळला म्हणाले. २४ तारखे नंतर तुझा हिशोब करतो. तुला दाखवतो. हे कायसुरु आहे? मराठा समाजाला विरोध नाही. आमचा विरोध दादागिरी आणि झुंडशाहीला आहे. दादागिरी सुरू राहिली तर दादागिरीला दादागिरीनेच उत्तर देऊ. आमच्यावर जबाबदारी आहे. नंतर बोलू नका अशांतता पसरवली. त्यांना सांगा बोलताना नीट बोला. पोलिसांवरील हल्ले थांबवा, असा इशाराच छगन भुजबळ यांनी दिला.

(हे देखील वाचा – राष्ट्रवादी पक्ष कुणाचा?)

Follow us on social media:

राज्यात अशांतता करतंय कोण? राज्यात शांतता असेल तर उद्योग धंदे येतील, बेरोजगारी दूर होईल. राज्यातील उद्योगधंदा वाढेल हे मान्य. पण अशांतता निर्माण करतं कोण? याचा विचार करण्याची गरज आहे. पोलिसांना सांगायचं तुम्ही वेळेवर ॲक्शन घेतली नाही तर पुढे तुम्ही काहीच करू शकणार नाही. ते अशांतता माजवतील. तेव्हा तुम्ही काय करणार? केवळ रिव्हॉल्वर घेऊन तुम्ही बघ्याची भूमिका घेणार का? असा सवाल त्यांनी पोलिसांना केला.

यावेळी छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यानंतर त्यांनी जरांगेंची नक्कल करत खिल्ली उडवली. मनोज जरांगे यांनी आमदार नारायण कुचे यांच्या शारीरिक व्यंगावर टीका केली. कुणाच्या शारीरिक व्यंगावर टीका करणे अशोभनीय आहे. आपण दिव्यांग म्हणतो. ते काय म्हणाले ते मी वाचून दाखवतो, असे छगन भुजबळ म्हणाले. यावेळी छगन भुजबळ मनोज जरांगे यांच्या हिंदी भाषेत केलेल्या वक्तव्यावर टीका करतात. “तू डोक्याने दिव्यांग झालाय, तुला हिंदीसुद्धा येत नाही, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.

अधिक सोडेट्साठी आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!