धाराशिव – महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यासाठी एक रुपयात पीक विमा योजना जाहीर केलेली असून, ज्वारी पिकाचा विमा भरण्यासाठी 30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती मात्र तीन दिवस बाकी असताना अचानक पीक विम्याची ऑनलाईन साईट बंद झालेली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची सीएससी केंद्रात गर्दी झालेली पहायला मिळत आहे.शेतकऱ्यांना आपली शेतीचे कामे सोडून दिवसभर सीएससी केंद्रावर ताटकळत उभे राहावे लागत आहे. पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद असल्याने वेबसाईट बंद असल्याने शेतकरी हैराण झालेले असून यामुळे सदर वेबसाईट मध्ये दुरुस्त करून ज्वारी पिकाचा पीक विमा भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकरी करत आहे.जेणेकरून असंख्य शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाहीत व त्यांचे नुकसान न होता विम्याची रक्कम देखील काही प्रमाणात मिळेल.