बीड – मराठ्यांनी मुंबईकडे कुच केली तर आरक्षण घेऊनच माघारी फिरणार असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी मोठी घोषणा केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर शिवाजी पार्कवर २० जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार, असं मनोज जरांगे पाटलांनी जाहीर केलं आहे. मुंबईत जाताना कुठेही हिंसा नको. सर्वांनी शांततेच मुंबईला जायचं. असंही मनोज जरांगे पटालांनी म्हटलं आहे.
जाणूनबूजून कोणताही मराठा सरकारला त्रास देणार नाही. आता बीडच्या सभेत जवळपास १२ ते १३ लाख मराठे सभेसाठी आले आहेत कोणाला त्रास झाला का ? पोलीस सुद्धा आता आरामात उभे राहिले आहेत. तसेच जो हिंसा करेल तो आपला नाही. लक्षात ठेवा. आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरायचं नाही. आता त्यांना टेन्शन आलं असेल देव जरी आडवा आला तरी आरक्षण घेणारच असंही मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटलांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. छगन भुजबळ यांंचं ऐकून आरक्षण नाकारू नका. अन्यथा सरकारला जड जाईल. एकदा आरक्षण मिळालं की नंतर काय ते दाखवतो. असा इशाराही त्यांनी दिला आहे.