रस्त्यावर वाढदिवस केला तर कडक कारवाई होणार – संतोष गिरिगोसवी,पो.नि बार्शी शहर पोलीस
बार्शी – बार्शी शहरातील शिवशक्ती मैदानाच्या जवळ 15 तरुणांनी त्यांच्या मित्राचा वाढदिवस रस्त्यात गाडी लावून साजरा करत असताना शेजारील नागरिकांना त्रास झाला. त्यांनी तात्काळ बार्शी शहर पोलीसांना कळवले असता पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी तिथे जाऊन पाहणी करत तरुणांवर कारवाई केली.
(हे देखील वाचा – भुजबळांना पाडण्याची भाषा करू नका अन्यथा..)
बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरिक्षक संतोष गिरीगोसवी यांनी बोलताना सांगितले की बार्शी शहरात रस्त्यावर असे वाढदिवस साजरे करताना कोणी दिसले तर लगेच बार्शी पोलीस स्टेशनला संपर्क करावा तसेच येथून पुढे रस्त्यावर वाढदिवस साजरा केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे बार्शी पोलीसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.