मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय वातावरण खासदार संजय राऊत यांनी टविट केलेल्या एका फोटोमुळे पुन्हा तापले आहे. संजय राऊत यांनी एका कसिनोमधील फोटो टविट केला आहे. फोटो मधील एका व्यक्तीने रात्रीत 3.50 कोटी रुपये कसिनो जुगारात उडवले, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी “हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत… खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?”, असा सवाल केला आहे. राऊत यांच्या टवीटमुळे खळबळ उडाली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संजय राऊत यांनी टविट केलेल्या फोटोत जुगार खेळणारी व्यक्ती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यावर भाजपच्या अधिकृत टविटर अकाउंटवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
संजय राऊत यांचे ट्वीट काय?
“19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट: मकाऊ,४९॥65॥1718. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने AEA द्युत ..खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?”
कोणत्या ब्रँड ची व्हिस्की?राऊत यांच्या ट्वीट ला भाजपचे प्रत्युत्तर
संजय राऊत यांच्या टवीट ला भाजपने प्रत्युत्तर देताना म्हंटले आहे की, “आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हाटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ आदित्यच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हिस्की?”, असा सवाल करत भाजपने केला आहे.
मोहित कंबोज यांची ही राऊतांवर टीका
भाजप नेते मोहित कंबोज यांनी म्हंटले की, “संजय राऊतांनी आज खालच्या दर्जाची कृती केली आहे. त्यांची मानसिकता खराब झाली. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. संजय राऊत यांना माझी विनंती आहे, माझे जे 25 लाख रुपये आपल्याकडे आहेत, ते आजपर्यंत तुम्हाला मला परत दिले नाहीत. पण एका चांगल्या Sas जावून तुम्ही उपचार घ्या. तुम्ही माझे जुने मित्र आहेत. तुम्ही अशा आजाराने त्रस्त आहात ज्यावर उपचार करण्याची नितांत गरज आहे”, अशी टीका मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांनी केली आहे.