ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांना अटक केल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भांडुप पोलीस स्टेशन समोर शिंदे गटाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी
मुंबई – मुंबईचे महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांना आज बुधवारी (29 नोव्हेंबर) रोजी भांडुप पोलिसांनी अटक केली. त्यांच्या अटकेनंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर व्यक्तीशा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली.
ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांना अटक केल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी भांडुप पोलीस स्टेशन गाठत शिंदे गटाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले की, मुंबईचे माजी महापौर, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांना आज सकाळी पोलिसांनी घरात घुसून अटक केली. मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना जशाप्रकारे अटक करतात तशी अटक करण्यात आली आहे. दत्ता दळवी यांचा गुन्हा काय आहे तर त्यांनी महाराष्ट्रातील लोकांच्या लोकभावना बोलून दाखल्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आणि त्यांचे सहकारी जे गद्दार हृदयसम्राट आहेत. ते स्वतःला हिंदुहृदय सम्राट म्हणून घेतात त्यांच्यावर तमाम हिंदूंचा आक्षेप आहे, जनतेचा रोष आहे याच भावना दळवींनी बोलून दाखवल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्याचा रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही येथे आलो असल्याचे ते म्हणाले.
हा तर वीर सावरकर, बाळासाहेबांचा अपमान
याविषयी आणखी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, गद्दारांनी स्वतःला हिंदुहृदयसम्राट म्हणुन घेणे हा वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहीजे. मी मुख्यमंत्र्यावर बोलत नाही, मी व्यक्तीशा एकनाथ शिंदे यांच्यावर बोलतोय की, ते वीर सावरकर, आणि बाळासाहेबांची पदवी स्वतःला लावून घेतात, अशा शब्दांत राऊत यांनी शिंदेवर निशाणा साधला
अवकाळी संकटावरून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न
संजय राऊत म्हणाले की, हे जे सगळं सुरू आहे हे सगळ राज्यातील अवकाळीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी सुरू असून, तिकडे प्रचार दौरे करायचे आणि इकडे शेतकरी वाऱ्यावर सोडायचे, यावर टीका केल्यानंतर कारवाई करायची असे सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.