मुंबई – राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगळाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केळे जात आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिकाही स्विकारळी आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशनही होणार आहे.
दुसरीकडे, मराठा आरक्षणप्रश्नी लवकरच मनोज जरांगेंचा मोर्चा मुंबईत दाखल होणार आहे. येत्या २० जानेवारी रोजी हा मोर्चा आंतरवाली सराटीहून मुंबईकडे पायी निघणार आहेत. तर २६ तारखेला तो मुंबईत दाखल होईल. हा मोर्चा खेळीमेळीच्या वातावरणात आनंदाने मुंबईला जाणार आहे. तसेच रस्त्यात ठिकठिकाणी पारंपारिक खेळांचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय सोबत काही खाण्याचे पदार्थही घेतळे जाणार असून गाड्यांमध्येच खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे.