लोखंडी पाइपने डोक्यात मारहाण, नराधम तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अणदूर येथील तरुणाने शेजारीच राहणाऱ्या तरुणीला लाथाबुक्यांनी, लोखंडी पाइपाने डोक्यात मारहाण करुन तसेच ॲसिड सारखा पदार्थ हातावर फेकून गंभीर जखमी केले. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये सदर नराधम तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हल्ला करणारा मनोज मल्लीनाथ घोडके अणदुर (ता. तुळजापूर) याने दि.16.12.2023 रोजी 10.30 वा. सु. घोडके वस्ती अणदुर येथे फिर्यादी रेवती तुळशीदास घोडके, वय 20 वर्षे, रा. घोडके वस्ती अणदुर ता. तुळजापूर जि.धाराशिव यांना नमुद आरोपीने घरात घुसून तु मला का बोलत नाही? तुझ्यावर माझे प्रेम आहे असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाइपाने डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच अॅसिड सारखा पदार्थ फिर्यादीचे हातावर टाकुन गंभीर जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराची फिर्याद रेवती घोडके यांनी दिली. दि.16.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 326(अ), 324, 323, 452, 504, 506 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.