जालना – उपोषण केले, पोलिसांचा लाठीचार्ज झाला. तो लाठीचार्ज सगळ्यांनी पाहिला. फक्त ७० पोलीस कर्मचारी होते. तिथे तेव्हा दगडाचा मारा सुरू झाला. ७० पोलिस काय पाय घसरून पडले का ? महिला आयोगाने त्या महिला पोलिसांना विचारा. शिवाजी महाराजांनी मोघलांच्या सुनेला परत पाठवले पण यांनी काय केले तर महिला पोलिसांवर दगडफेक केली. असा हल्लाबोल मंत्री छगन भुजबळांनी केला आहे.
आरक्षण कसे मिळाले हे यांना काहीच माहित नाही. सकाळी उठतो आणि आमची लेकरं बाळं लेकरं बाळ करतो. छगन भुजबळ पिठलं भाकर खाऊन आला आहे. अरे होय मी पिठलं भाकरी खाऊन आलो आणि दिवाळीत पण मी घरी पिठलं भाकरी खातो. पण तुझ्यासारखं सासऱ्याच्या जीवावर तुकडे मोडत नाही. अशी टिका भुजबळांनी केली आहे.
(हे देखील वाचा – मराठा आरक्षणासाठी धाराशिव जिल्ह्यात एकाची आत्म्हत्या)
दरम्यान, वयानुसार त्यांना बोलण्याचं भान राहिलं नाही. ते आता ओबीसी बांधवांच्या नजरेतूनच उतरले आहेत. मराठवाड्यात जुन्या नोंदी मिळत असतील तर आपल्या नेत्यांनी त्यात डोकं खुपसू नये असे ग्रामिण भागातील ओबीसी बांधव सांगत आहेत. परंतु आता उद्यापासून त्यांना कुणालाच महत्व देणार नाहीत. असा पलटवार मनोज जरांगे पाटलांनी केला आहे.