तुळजापूर – अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी काढलेली चित्ररथयात्रा दिनांक 12 सप्टेंबर रोजी रामतीर्थ येथे मुक्कामी होती. रामतीर्थ तांडा,रामनगर तांडा, आलियाबाद तांडा, सोमलिंगनगर तांडा येथील मायबाप जनतेशी सवांद साधण्यात आला.
लोकप्रतिनिधी फक्त निवडणूकीपुर्ते तोंड दाखऊन जातात, त्यानंतर पाच वर्ष कोणीही वळून बघत नाही, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
कार्यकर्त्यांच्या आयुष्याचं वाटोळं झालं तरी राजकारण्यांना काही देणंघेणं नसतं. सर्वाधिक व्यसन ही निवडणूक काळात तरुणांना लागतात हे दुर्दैव्य आहे. त्यामुळे मला समाजात कार्यकर्ता निर्माणच करायचा नाही, तर स्वतःच्या कुटुंबासह समाजाचं जीवन समृद्ध करणारे सहकारी निर्माण करायचे आहेत अशी भावना शेतकरी पुत्र आण्णासाहेब दराडे यांनी यावेळी व्यक्त केली. आण्णासाहेब दराडे यांनी ऐकण्यासाठी गावातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते