धाराशिव – तुळजापूर विधानसभेसाठी लढा परिवर्तनाचा घेऊन निघालेल्या आण्णासाहेब दराडे यांच्या जनसंवाद यात्रेस गावोगावी जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे
तुळजापूर विधानसभेसाठी आण्णासाहेब दराडे हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. प्रस्थापितांच्या विरोधात आण्णांनी दंड थोपटल्याने तुळजापूर विधानसभे मध्ये चुरस निर्माण होणार आहे. दराडे यांनी गावोगावी गाटीभेटी दौरे सुरू केले असून चित्र रथाच्या माध्यमातून ते नागरिकांपर्यंत पोहचत असून गावोगावी त्यांच्या चित्र रथ यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

गावोगावी जात तिथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत, नागरिकांना अडचणींचा सामना आजही का करावा लागत आहे? तसेच आत्तापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी आपल्याला जाणून-बुजून मागे का ठेवले? का पाहिजे तेवढा विकास केला नाही? ह्या गोष्टी पटवून देत भविष्यात आपल्या गावचा व मतदार संघाचा विकास हा कश्या प्रकारे चांगला करता येईल याचा जाहीरनामा ते जनतेसमोर मांडत आहेत.
हे देखील वाचा – घरात खेळणाऱ्या ती वर्षाच्या चिमुरडीवर त्याने..