• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, July 4, 2025
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न📰 धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या📰 धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन📰 खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा📰 ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

सोलापूर-उमरगा रोडवर भर दिवसा प्रवाशांची लुटमार?

MH25News by MH25News
January 17, 2024
in क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
सोलापूर-उमरगा रोडवर भर दिवसा प्रवाशांची लुटमार?
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर येथील पत्रकार तथा निवेदिका श्वेता हुल्ले यांनी फेसबुक पोस्ट करत सांगितला भयानक प्रकार

धाराशिव – सोलापूर-उमरगा रोडवर दिवसा ढवळ्या प्रवाशांची लुटमार होत असल्याचे पत्रकार श्वेता हुल्ले यांनी फेसबुक पोस्ट करत त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेचा थरारक प्रसंग सांगितला आहे.

काय आहे नेमकी फेसबुक पोस्ट?

साधारण ८-१० दिवसांपूर्वीची घटना आहे ही… माझी आई, भाऊ, त्याची लहान साडेतीन वर्षाची मुलगी आणि भावाचे 2 मित्र अणदूर जवळील चिवरी महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून सोलापूरकडे येत असताना, भर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ईटकळ गावाच्या पुढे सोलापूरच्या दिशेने 1 किलोमीटर अंतराच्या हायवेवर गाडी पुढे गेली असताना, एक उंच, काळाकुट्ट, भयंकर दिसणारा माणूस रस्त्याच्या मधोमध हातामध्ये भला मोठा जाड राॅड घेऊन आमच्या गाडीच्या अगदी समोर गाडी अडवत येऊन उभा राहिला. गाडी भाऊ ड्राईव्ह करत होता. त्याला पाहिल्यानंतर भावाला प्रचंड भीती वाटली. त्याला लक्षात आले की हा माणुस आता आपल्याला अडवून लूटमार करणार. तो गाडी तसाच चालवत पुढे निघाला होता. पण नविन kia seltos च्या ADAS फीचर्सच्या Auto Emergency Breaks या नवीन फीचरमुळे ती व्यक्ति समोर आल्यामुळे अचानक जोरात break लागून गाडी जागेवर थांबली. गाडीचा स्पिड खुप जास्त होता तेवढ्याच जास्त स्पिड मध्ये गाडी जागेवर थांबली. त्यामुळे गाडीत बसलेल्या बाळाला, आईला वगैरे थोडा मार लागला. लागलीच तो दरोडेखोर समोरच्या बोनेटवर काच फोडण्यासाठी म्हणून चढला. आणि त्याने आजूबाजूला शेतात लपलेल्या त्याच्या साथीदारांना आवाज देऊन बोलवले.

लगेच शेतामध्ये लपलेले ६-७ दरोडेखोर हातामध्ये चाकू, कुऱ्हाड, तलवारी आणि राॅडसारखी भयानक शस्त्र घेऊन गाडीवर हल्ला चढवू लागले. मोठा दगड घेऊन मागच्या सीटवर माझी आई बसली होती. तिथे तिच्या साईडला काचेवरती त्यांनी टाकला. पण काच फुटली नाही. त्यामुळे ते आणखी जास्तच चवताळले. त्या रोडवर पुढे आणि पाठीमागे साधारण 1 किलोमीटर पर्यंत तरी कुठलीच गाडी किंवा कोणतेच वाहन तिथे नव्हते. मात्र आम्ही सोलापूरच्या दिशेकडे निघालेलो होतो. पलीकडे उमरग्याच्या दिशेला जाणारे एक ट्रक ही असाच दरोडा टाकून त्यांनी उभा केला होता. आणि त्यांना सुद्धा प्रचंड मारहाण सुरू होती. आमच्या गाडीच्या समोर उभा असणारा माणूस काचा उघडा, गाडीचा दरवाजा उघडा म्हणून जोरजोरात धमकाऊ लागला. आजूबाजूने हल्लेखोर चाकू, कोयता, कुऱ्हाडी आणि काठ्या घेऊन गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करतच होते. गाडीत बसलेले सगळेच प्रचंड घाबरले होते. तेवढ्यात एकाने पाठीमागे जाऊन मागची काच फोडली. त्याच क्षणी समोर असलेला दरोडेखोर आणि इतर सगळेच पाठीमागून गाडीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी माझ्या भावाने समोरून दरोडेखोर सरकल्यामुळे गाडी स्पीडमध्ये पुढे नेली आणि फास्ट पळवत सोलापूरच्या दिशेला आणली. आणि कसेबसे सर्वांचे प्राण वाचवले. या भयानक घटनेमुळे आम्ही सगळेच पूर्ण हादरून गेलो आहे.
एकतर नविन kia seltos च्या ADAS फीचर्सचा Auto Emergency Breaks हे फीचर आपल्या सुरक्षेसाठी असेल यामुळे अपघात टाळू शकतो अस वाटल, मात्र या घटनेमुळे या फीचर्समुळे किती मोठ्या संकटात सापडू शकतो, किती भयानक किंमत यामुळे मोजावी लागली असती कल्पनाच न केलेली बरी..
दुसरी गोष्ट म्हणजे… तिथून कसा तरी जीव वाचवत माझा भाऊ आणि गाडीतले इतर सगळे थोडेसे पुढे आले. आणि पुढे येऊन त्यांनी 112 नंबरवर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यावेळी तिथून अजब उत्तर मिळाले. त्यांनी सांगितले की तिथेच थांबा, आम्ही येत आहोत. त्यांचे उत्तर ऐकून आम्हाला हसावे की रडावे तेच कळत नाहीये. तिथेच थांबा म्हणजे त्या दरोडेखोरांकडून जीव गमावून घ्या, मार खावा, तोपर्यंत आम्ही सगळे झाल्यावर येतोच तिथे, असा अजिबात होत नाही बर का.!
या घटनेनंतर तिथून निघून थेट सोलापूर शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरच गाडी उभी केली. स्वतःचा जीव एवढ्या भयानक परिस्थितीतून वाचवून आल्यावर कळत नव्हते नेमके काय करावे. यासाठी थोडा वेळ गाडी बाजूला लावली आणि पाणी पिऊन थांबले. तेवढ्यात एक ट्रॅफिक पोलिस तिथे आले, त्यांना माझ्या भावाने सगळी हकीकत सांगितली. विचारले की तुम्ही कोण यावर कारवाई का करत नाही? त्यांनी उत्तर दिले कि आम्ही तिथेच राहतो. त्यामुळे आमचा जीव धोक्यात येईल आम्ही काही बोलू शकत नाही. तुम्ही बोला, तुम्ही आवाज उठवा
आपण जर सोलापूर-उमरगा किंवा उमरगा-सोलापूर प्रवास करत असाल तर सावध राहा. या रोडवर भरदिवसा ढवळ्या गाड्या अडवून दरोडेखोर लोकांना लुटत आहेत. तुमचा जीव ही घ्यायला ही लोक पुढे मागे पाहत नाहीत. निव्वळ दैव बलवत्तर म्हणून आमच्या घरचे सुखरूप आहेत…
भयानक घटनेने आम्ही हादरून गेलो आहोत. या हायवेवर प्रवास करणार्‍यांना सावध करावे म्हणुन ही पोस्ट केली आहे. ही घटना फक्त आज घडली असे नाही, या पोस्टनंतर बरेच फोन आणि मेसेज आले आहेत. बर्‍याच जणांना हा अनुभव गेल्या अनेक वर्षापासुन आले आहेत. या रोडवर बर्‍याच जणांचे गाड्या अडवून त्यांना लुटले गेले आहे. आम्ही याची रीतसर तक्रार केली आहे. त्यावर सुरू आहे कारवाई करण्याची त्यांच्या परीने प्रक्रिया… पण आपल्या सर्वांपर्यंत ही घटना पोचवून आपल्याला सावध करावे यासाठी हा लेख प्रपंच…. त्यामुळे विनंती आहे इथून जाता येताना सावध राहा. ही पोस्ट कृपया जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत पोचवा.

श्वेता हुल्ले-सोलापूर

संबंधित बातम्या

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
ग्रामीण

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न

July 2, 2025
धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
क्राइम

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

June 30, 2025
धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
अर्थव्यवस्था

धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

June 27, 2025
खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
आरोग्य

खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा

June 26, 2025
ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
क्राइम

ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले

June 16, 2025
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा
क्राइम

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

June 13, 2025

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
  • धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
  • धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
  • खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
  • ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!