मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी महायुतीच्या सभांमधून ठाकरे गटावर जोरदार टीका सुरू केली आहे. माझ्या पक्षाचे सहा नगरसेवक फोडून फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात उद्धव ठाकरे यांनीच केली होती असा देखील आरोप राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की राज ठाकरे यांनी वेगळा पक्ष स्थापन करून वीस वर्षे झाली आहेत मात्र एक अशी घटना सांगा की आम्ही त्यांच्यावर टीका केली, काही नात्यांवर आपण बोलायचे नसते असे घरातून सांगितले आहे. आमच्याकडे मनसेचे जे नगरसेवक आले ते नंतर निवडून आले त्यातले काही आमदार देखील झाले होते.आता आमच्यातून गेलेल्या गद्दारांची जशी स्थिती झाली तशी स्थिती त्या नगरसेवकांची झाली नव्हती.
अधिक अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा
भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच सगळ्यांना धोका आहे मी भाजपच्या नेत्यांची एक यादी तुम्हाला देतो आताच्या काळात तुम्हाला भाजप नेत्यांची प्रतिक्रिया घ्यायची असेल तर कोणती नावे येतात? बाहेरून पक्षातून आलेले नेतेच पुढे येत आहेत सगळेच्या सगळे 2019 मध्ये आयात केलेले आहेत असा हल्लाबोल देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.