• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, July 4, 2025
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न📰 धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या📰 धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन📰 खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा📰 ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

लाडकी बहिण योजनेला विरोध करणाऱ्यांना जागा दाखवून द्या – आ. राणाजगजितसिंह पाटील

MH25News by MH25News
September 30, 2024
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
लाडकी बहिण योजनेला विरोध करणाऱ्यांना जागा दाखवून द्या – आ. राणाजगजितसिंह पाटील
0
SHARES
60
VIEWS

नळदुर्ग येथे माता-भगिनींचा सन्मान

धाराशिव – माता भगिनींना सर्वार्थाने सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने अनेक महत्वाच्या योजना हाती घेतल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही त्यातीलच एक महत्वपूर्ण योजना आहे. राज्यातील कोट्यावधी माता भगिनींना त्याचा लाभ होत आहे. योजना यशस्वी ठरत असल्याने साहजिकच विरोधकांच्या पोटात दुखत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेला विरोध करणाऱ्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जागा दाखवून द्यावी.

‘स्त्रीशक्तीचा सन्मान आणि मातृशक्तीला आधार’ या संकल्पांतर्गत नळदुर्ग येथे सौ.अर्चना पाटील यांच्या पुढाकारातून अंबाबाई मंदिर सभागृहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी माता भगिनींसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण महिला बचत गटाच्या मीरा महाबोले व भाग्यलक्ष्मी बचत गटाच्या जिजाबाई जाधव उपस्थित होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तुळजाभवानी देवी, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

आपल्या परिसरातील १० हजार मुला-मुलींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. नळदुर्ग आणि परिसरात केलेल्या आणि होऊ घातलेल्या अनेक महत्वपूर्ण कामांबाबत उपस्थितांना संबोधित केले. नळदुर्ग शहरात पाच एकर जागेवर भव्य व राज्यातील क्र. १ ची बसवसृष्टी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ५ कोटी रूपये मंजूर झाले आहेत. त्याचबरोबर हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे स्मारकही उभारण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा दैदिप्यमान इतिहास आणि त्यावेळी हौतात्म्य दिलेल्या शहिदांचा सन्मान राखण्यासाठी भव्य असे मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारकही साकारले जाणार आहे. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी शहिद झालेले, पंजाबचे भूमिपुत्र असलेले शहिद बचित्तर सिंग यांच्या कार्याची महती या स्मारकाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. मुस्लिम समाजासाठी भव्य शादिखाना, बौद्ध समाजासाठी सभागृह यासह नळदुर्गच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात आणखी विकासकामे प्रस्तावित आहेत. राज्यभरातून तसेच देशातून अधिकाधिक पर्यटक येथे कसे येतील, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकंदरीत या सर्व कामांच्या माध्यमातून नळदुर्ग शहर आणि परिसराचा चेहरामोहरा बदलून खर्‍या अर्थाने नळदुर्ग शहराचा विकास सिध्द करणार असल्याचेही यावेळी सांगितले.

नळदुर्ग शहरात लवकरच अप्पर तहसील कार्यालय सुरू होत आहे. पुढील काळात नळदुर्ग येथे स्वतंत्र तहसील कार्यालय आणि नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. महायुती सरकारने मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण, लखपती दिदि योजनेअंतर्गत एक लाखापर्यंतची मदत, बचत गटांंचे सक्षमीकरण, रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत कर्ज रकमेवर ३५ टक्क्यापर्यत वाढीव अनुदान, अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर, अशा अनेक योजना मातृशक्तीला सक्षम करण्यासाठी सुरू केल्या आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीलाच मतदान करण्याचे आवाहन केले.

यावेळी अर्चना पाटील यांनीही शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती उपस्थित महिलांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक माधुरी पद्माकर घोडके यांनी केले. सौ.अर्चना यांच्या हस्ते लाडक्या महिलांचा सन्मान म्हणून उपस्थित हजारो महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुशांत भूमकर, नय्यर जहागीरदार, रणजितसिंह ठाकूर, श्रमिक पोतदार, धीमाजी घुगे, गणेश मोर्डे, अक्षय भोई, सागर हजारे, बंडू पुदाले, पांडूरंग पुदाले, पद्माकर घोडके, सुनील बनसोडे, जमन ठाकूर यांच्यासह नळदुर्ग शहर भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमात श्रीमती कविता पुदाले, उद्योजक कल्पना गायकवाड, बचत गटाच्या मीराताई महाबोले, वैद्यकिय सेवा देणार्‍या डॉ. स्वाती पाटील, सामाजिक कार्यकर्त्या शाहेदाबी सय्यद, अक्षरवेलच्या अध्यक्ष शिल्पा पुदाले, जलतरणपटू अश्वेता गायकवाड यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

संबंधित बातम्या

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
ग्रामीण

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न

July 2, 2025
धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
क्राइम

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

June 30, 2025
धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
अर्थव्यवस्था

धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

June 27, 2025
खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
आरोग्य

खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा

June 26, 2025
ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
क्राइम

ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले

June 16, 2025
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा
क्राइम

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

June 13, 2025

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
  • धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
  • धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
  • खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
  • ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!