पुणे – चिंचवड मतदारसंघात गिरीराज सावंत यांच्या हस्ते 50 हजार वह्या देऊन आमदार शंकरशेठ जगताप यांचा ऐतिहासिक विजयाबद्दल सत्कार करण्यात आला
धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे सुपुत्र आणि कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गिरीराज सावंत यांनी चिंचवड विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व कामगिरी करून प्रचंड मतांनी विजयी झालेले आमदार शंकरशेठ जगताप यांचा सत्कार केला.
आ. शंकरशेठ जगताप यांनी विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी हार तुरे न आणता, विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य भेट द्यावे या आवाहनाला प्रतिसाद देत गिरीराज सावंत यांनी 50 हजार वह्या आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व ऐतिहासिक विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी चंद्रकांत सरडे, नरेशशेठ कदम, सुनिलशेठ अभंग, शरदराव जाधव, उमाकांत कुलकर्णी, नितिन कुलकर्णी, हिराशेठ सोनवणे, श्रीकांत चौधरी, आप्पा माचुत्रे, सागर खुटवड, मंगेश भोसले, अतिष जाधव, आणि अमर देशमुख यांच्यासह कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.