खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ.कैलास पाटील यांना धक्का
४ जागा बिनविरोध तर ९ पैकी ८ जागा मोठ्या फरकाने जिंकल्या
धाराशिव – धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर स्थापनेपासून डॉ पद्मसिंह पाटील यांचे वर्चस्व होते.पुढे त्यांचे चिरंजीव व भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यावर आपली सत्ता कायम ठेवली.२०२५-२०२९ च्या पंचवार्षिक निवडणुक खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.एक मतदार थेट दिल्लीहून विमानाने आणला होता मात्र आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी आखलेल्या रणनितिपुढे त्यांचे कांही चालले नाही.

या निवडणुकीत आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल चे १३ पैकी १२ उमेदवार निवडून आले.आ.पाटील यांच्या गटाच्या चार जागा सुरुवातीला बिनविरोध निवडून आल्या होत्या.उर्वरित ९ जागासाठी निवडणूक झाली होती त्यात लोहाऱ्याची जागा महाविकास आघाडीने केवळ १ मताने जिंकली व आ.पाटील यांच्या पॅनल च्या ८ जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या.