गावाच्या विकासासाठी राजकीय गट तट विसरुन एकत्र या.
धाराशिव – राजकारणाच्या ठिकाणी राजकारण तर समाजकार्यच्या ठिकाणी समाजकारण हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी धनंजय सावंत यांच्या वतीने परंडा तालुक्यातील नालगाव येथे गावभेट व जनसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दि.१७ रोजी नालगाव येथील मारुती मंदिर येथे जनसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले, या बैठकीत गावातील नागरिकांच्या अडीअडचणी व विविध समस्या जानुन घेण्यात आल्या. यावेळी गावात तलाठी, ग्रामसेवक, शासकीय दवाखान्यात कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचे नागरीकांनी तक्रार धनंजय सावंत यांच्या समोर मांडली सावंत यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वरीष्ठांना लागलीच तात्काळ फोनवरून संपर्क साधून उपस्थित राहत नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठांची चांगलीच कान उघडणी करुन जे कर्मचारी उपस्थित राहु शकतात अशाच कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या नालगाव येथे करण्याचे सांगितले.
गावाच्या विकासासाठी राजकीय गट तट विसरुन एकत्र या अशी साद सावंत यांनी ग्रामस्थाना घातली.
त्याच बरोबर शेतकऱ्यांना शेतीसाठी रस्त्याची मोठी आवश्यकता असते हे ओळखून नांलगाव ते शेंदरी या पाणंद रस्त्याचे उद्घाटन नारळ फोडून सावंत यांनी यावेळी केले.गावचे असणारे ग्रामदैवत खंडोबा मंदीर कामाचे नारळ फोडून उद्घाटन त्यांनी केले, त्याच बरोबर शिवारातील अनेक शेतरस्त्याची कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना भैरवनाथ उद्योग समूहाच्या यंत्रणेस दिल्या.यावेळी गावातील शक्य तेवढ्या समस्या भैरवनाथ उद्योग समूहाच्या वतीने सोडवू असे त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले.
यावेळी सरपंच महेश करळे,अंगद करळे, सचिन करळे,सुशिल करळे,बालाजी करळे,अरूण करळे, सिद्धेश्वर करळे, जिल्हा समन्वयक गौतम लटके,नागा पाटील आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.