धाराशिव – लोकसभेसाठी खासदार ओमराजे निंबाळकर हे निवडणुकीला उभे आहेत, खासदार जरी उमेदवार असले तरी आपणच उमेदवार आहोत या भावनेने कामाला लागण्याचे अवाहन आमदार कैलास पाटील यांनी पदाधिकारी यांना केले आहे. (ता.२३) शनिवारी धाराशिव तालुका पदाधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीला जिल्हा सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमानी, जिल्हा बँकेचे संचालक संजय देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती शाम जाधव, उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, संग्राम देशमुख,तुळशीदास जमाले तसेच तालुक्यातील सर्व विभागप्रमुख गटप्रमुख,आदीची उपस्थिती होती. आमदार पाटील म्हणाले की, आपले उमेदवार उध्दवजी ठाकरे यांनी जाहीर केले आहेत. दुसरीकडं महायुतीमध्ये उमेदवार शोधताना दमछाक झाल्याचे दिसत आहे. आपला उमेदवार इतका सक्षम आहे की, समोर दुहेरी सत्ता, अफाट पैसा , अमर्याद यंत्रणा असतानाही त्यांना तुल्यबळ व्यक्ती मिळत नाही. हीच आपल्या विजयाची खात्री आहे अस असले तरी निवडणुकीत कोणीही गाफिल राहु नये असे अवाहन यावेळी आमदार पाटील यांनी केले आहे. आपण जनतेमध्ये आहोतच शिवाय जनताही आपल्या सोबत आहे त्या जनतेचं मतात रुपांतर करणे हे आपलं पहिल प्राधान्य असले पाहिजे असे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले.धाराशिव तालुक्यातुन सर्वाधिक मताधिक्य मिळण्यासाठी आजपासून कार्यकर्त्यानी कामाला सुरुवात करण्याचे आदेश जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांनी दिले. पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात संवाद साधल्याने कार्यकर्त्याला मोठी उर्जा मिळाली असल्याचे सहसंपर्क प्रमुख मकरंदराजे यांनी यावेळी सांगितले.