धाराशिव – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अर्थसंकल्पात सादर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे धाराशिव शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांना राखी बांधून युवतींनी आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी महायुती सरकारने अर्थसंकल्पात कल्याणकारी योजनांची तरतूद केली आहे. या योजनांचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.