धाराशिव – राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या आदेशानुसार परिवहन महामंडळाने तात्काळ कार्यवाही करत पिंपरी-चिंचवड ते भूम-परांडा-वाशी एसटी बस सेवा सुरू केली आहे.
भूम, परांडा आणि वाशी तालुक्यांतील नागरिकांनी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक होत आपले रोजगार आणि उद्योग-व्यवसाय उभारले आहेत. नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीच्या आधारावर, आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी राज्य परिवहन महामंडळाला आदेश दिले आणि अखेर नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने कार्यवाही करत एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
वाल्हेकरवाडी (चिंचवड) ते परांडा-भूम वाशी ही बस मंगळवार (दि.8) पासून प्रवाशांच्या सेवेत सुरू झाली आहे. या सेवेचा शुभारंभ गिरीराज सावंत, संस्थापक, कार्यसिद्धी प्रतिष्ठान, पुणे यांच्या शुभहस्ते बसचे पूजन करून चालक-वाहकांचा सत्कार करण्यात आला. या नव्या बस सेवेने भूम, परांडा, वाशी तालुक्यांतील पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या कार्यक्रमावेळी गिरीराज सावंत यांच्यासह या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. चंद्रकांत सरडे (सामाजिक कार्यकर्ते), सचिन चिंचवडे (मा.उपमहापौर), समाधान सोलंकर (अध्यक्ष), शरद जाधव, प्रशांत पाटील, उद्योजक चंद्हास वाल्हेकर, समाधान भोरे (सरपंच जांब), मनोज मारकड, काका मारकड, नितीन कोपनर, सतीश पाटील, बंडू मारकड, बिबीशन घोडके, लक्ष्मण मिसाळ, अर्जुन लष्कर, राजाभाऊ जाधव, बाबा माळी, रवींद्र बागडे, परमेश्वर कोपनर, अंकुश खांडेकर, समाधान बुधनर, तानाजी कोपनर, नागनाथ वायकुळे, धनाजी गाडे, प्रभाकर कोळेकर, अक्षय वायकुळे, दादा कोपनर, गणेश देवकाते, शरद काळे, सुनील मुके, विठ्ठल कारंडे, सुरेश मारकड, विनायक वायकुळे, अभिजीत वायकुळे, वसुदेव कोपनर, तात्या कोपनर, हनुमंत ठोंबरे व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक अपडेट्ससाठी आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करा
या बस सेवेमुळे पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील नागरिकांना आता गावी जाण्यासाठी अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे, याचा फायदा अनेक नागरिकांना होईल.