धाराशिव तालुक्यातील पळसप येथील ९ व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनात ते बोलत होते.
धाराशिव – ग्रामीण भागातील नवोदित साहित्यिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पळसप सारख्या गावात साहित्य संमेलनाचे आयोजन आमदार विक्रम काळे करीत आहेत, ही मोलाची बाब आहे. तसेच शेतकऱ्यांची, बहुजनांची मुले प्रशासन सेवेत आली पाहिजेत यासाठीची त्यांची असलेली तळमळ लक्षात घेण्यासारखी आहे. त्यामुळे शिक्षकांनी देखील यापुढेही विक्रम काळे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना पुन्हा विधान परिषदेत पाठवावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष झाला असून आगामी निवडणुकीमध्ये मराठवाड्यातून लोकसभेची जागा लढवून मला खासदार व्हायचे आहे. त्यामुळे मला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार जानकर यांनी केले.