धाराशिव – केंद्रातील मोदी सरकार जाणार असून केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार १०० टक्के येईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमांतून व्यक्त केला आहे.
त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र तर निश्चितपणाने महाविकास आघाडीला अनुकूल आहे त्यासोबतच बिहार,उत्तर प्रदेश,पश्चिम बंगाल, कर्नाटक,मध्य प्रदेश,राजस्थान, तामिळनाडू,केरळ या राज्यात देखील इंडिया आघाडी मोठ्या प्रमाणावर जागा मिळवणार असून केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार निश्चितपणाने येईल.
अधिक अपडेटस् साठी आमच्या फेसबूक पेजला फॉलो करा
काल वेगवेगळ्या चॅनल्सने निवडणूक पूर्व अंदाज घोषित केले असले व त्यामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असे म्हटले असले तरी देखील देशातील एकंदरीत वातावरण पाहता पुन्हा एकदा मोदी सरकार येणार नसून केंद्रात इंडिया आघाडीचेच सरकार येईल असा विश्वासही त्यांनी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.