वाशी – धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील बावी गावचे शेतकरी अनंत अभिमान शिंदे, गणेश महेंद्र कानडे व अनिकेत उमाकांत कावळे हे तिघेजण काष्टी तालुका श्रीगोंदा येथून 27 एप्रिल रोजी दुग्ध व्यवसायासाठी तीन गायी खरेदी करून गाई पिकप मध्ये बावी कडे घेऊन जात असताना परंडा बायपास रोड बार्शी येथे गोरक्षण सुमित नवले, पंकज टिळेकर, अजय भानवसे व त्यांचे इतर सदस्य यांनी गाईची वाहतूक करणाऱ्या पिकप ला गाड्या आडव्या लावून पिकअप आडवीला व पाच हजार रुपये रकमेची मागणी केली आम्ही कशासाठी पैसे द्यायचे असे शेतकऱ्यांनी विचारल्यानंतर असे म्हणाले की या गाई तुम्ही कत्तलखान्याकडे घेऊन जात आहोत या आरोपाखाली तुमच्यावर गुन्हा नोंद करू आणि तुझ्या गाई गो शाळेत जमा करू अशी धमकी दिली आणि तिघांना देखील मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच शेतकऱ्यांचे मोबाईल व खिशातले पैसे बळजबरीने काढून घेतले व नंतर त्यांच्या गाई व त्यांना गाडीसह ग्रामीण पोलीस स्टेशन बार्शी येथे जबरदस्तीने नेऊन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकून पोलीसांना देखील आरेरावी करत होते. आणि तपास करण्यात पोलिसांना अडथळा निर्माण करत होते असे दिसून आले या हुकूमशा गोरक्षकाची हुकूमशाही कोण बंद करणार आणि अशा अनेक शेतकऱ्यांचा होणारा छळ कधी थांबणार गरीब शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक या अशा गुंडांपासून कधी थांबणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे
दरम्यान घडलेल्या घटनेची रीतसर चौकशी केली असून सदरील गाई शेतकऱ्यांच्या स्वाधीन केल्या असून पुढील अधिक तपास सुरू असल्याचे बार्शी ग्रामीण स्टेशन चे पीएसआय वळसनकर यांनी सांगीतले