• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, February 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?📰 धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग📰 धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी📰 सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ📰 तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

मंदिर संस्थान कार्यालय येथे मद्यपान करून तोडफोड; पुजाऱ्यावर गुन्हा दाखल

MH25News by MH25News
May 14, 2025
in Blog
0
0
SHARES
188
VIEWS

तुळजापूर – मंदिर संस्थान प्रशासनाकडून देऊळ कवायत कायद्यानुसार कारणे दाखवा नोटिस दिल्याने पुजारी अनुप कदम यांनी मद्यपान करून तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालय येथे येऊन तहसीलदार तथा व्यवस्थापक श्रीतुळजाभवानी संस्थान यांना अर्वाच्य भाषेत शिव्या देत, गोंधळ घालत तोडफोड केली. यावर मंदिर संस्थान कडून त्यांच्यावर तुळजापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंदिर संस्थानद्वारे नियुक्त सुरक्षा रक्षक पुरवठादार कंपनी SISPL PVT LTD कडून संस्थानास प्राप्त अहवालानुसार अनुप कदम यांनी 13 एप्रिल 2025 रोजी मंदिराच्या व्हीआयपी गेटवर सुरक्षा रक्षकांसोबत धक्काबुक्की व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने मंदिरात प्रवेश केला. यानंतरच्या घटनेत दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी संस्थान यांच्या दालनात कार्यालयीन कामकाज सुरू असताना अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मंदिर संस्थान आणि तहसीलदार तथा व्यवस्थापक श्री तुळजाभवानी संस्थान यांच्याशी अर्वाच्य भाषेत हुज्जत घातल्यानंतर तहसीलदार तथा व्यवस्थापक श्री तुळजाभवानी संस्थान यांनी कारवाई करण्याचा इशारा समक्षतेत देऊनही त्यास न जुमानता वाद घालत तिथेच बसले. दुसऱ्या अहवालानुसार 15 एप्रिल 2025 रोजी अनुप कदम यांनी श्री तुळजाभवानी संस्थान कार्यालयातील CCTV कंट्रोल रूम च्या दरवाज्यास लाथ घालून दरवाजा उघडल्याची घटना घडली. सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कंट्रोल रूम मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय प्रवेश देता येत नाही. हे दोन्ही अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंदिर संस्थान प्रशासनाने CCTV फुटेजचे अवलोकन करून वरील घटनांची खात्री केली आणि दिनांक 12 मे 2025 रोजी कारणे दाखवा नोटिस देऊन “मंदिराचे कायदा व सुव्यवस्थेस अडथळा निर्माण होईल असे अशोभनीय वर्तन केल्याने देऊळ कवायत कायदा कलम 24 व 25 नुसार 3 महिन्यांची मंदिर प्रवेश बंदी का करण्यात येऊ नये ?” याचा लेखी खुलासा करण्यास सांगण्यात आले.

Follow us on social media:

याचा राग मनात धरून अनुप कदम यांनी 13 मे 2025 रोजी मद्यपान केलेल्या अवस्थेत तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालय येथे येऊन तहसीलदार तथा व्यवस्थापक श्री तुळजाभवानी संस्थान यांच्या नावे अर्वाच्य भाषेत शिव्या देत गोंधळ घातला. यावेळी मंदिर संस्थान कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराची काच हाताने फोडली. या घटनेनंतर मंदिर संस्थानकडून तुळजापूर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 221, 352, 324(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला स्नेह मेळावा
Blog

श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला स्नेह मेळावा

October 26, 2025
Blog

शेतीचा वादाचा झाला खुनामध्ये शेवट पती-पत्नीचा भर रस्त्यात कोयत्याने वार करत खून

August 13, 2025
आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका
Blog

आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका

November 13, 2024
आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार
Blog

आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार

November 1, 2024
पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन
Blog

पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

October 4, 2024
धाराशिव  शहरासाठी तेरणा व रुईभर धरणातून पाणी आणण्यासाठी २३०.३२ कोटीस मान्यता
Blog

धाराशिव शहरासाठी तेरणा व रुईभर धरणातून पाणी आणण्यासाठी २३०.३२ कोटीस मान्यता

September 26, 2024

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
  • धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
  • धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी
  • सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
  • तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!