• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, July 4, 2025
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न📰 धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या📰 धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन📰 खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा📰 ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

फसव्या घोषणा करणाऱ्या सरकारच्या नेत्यांना आता दारात उभ करु नका – आ.कैलास पाटील यांचे जनतेला आवाहन

MH25News by MH25News
June 12, 2025
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, शहरी, संपादकीय
0
फसव्या घोषणा करणाऱ्या सरकारच्या नेत्यांना आता दारात उभ करु नका – आ.कैलास पाटील यांचे जनतेला आवाहन
0
SHARES
79
VIEWS

महायुती सरकारला दिलेल्या आश्वासनांचा विसर; ठाकरे सैनिक रस्त्यावर, धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक खोळंबली

धाराशिव येथे ठाकरे सैनिकांचे जोरदार चक्काजाम आंदोलन

धाराशिव – निवडणूक काळात फसव्या घोषणांची खैरात करत सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही.अश्या नेत्यांना व त्यांच्या कार्यकर्त्याना आता जनतेने दारात उभा करु नये असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केल.
सरकारच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्त्वात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (ता.12) धाराशिव शहरातील शिंगोली विश्रामगृहासमोर जोरदार चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तास केलेल्या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. सोलापूर आणि धुळे मार्गावर जाणार्‍या माल वाहतुकीसह प्रवाशी वाहनांची दुतर्फा मोठी रांग लागली होती.
शेतकर्‍यांच्या सोयाबीन व इतर शेतीमालाला हमीभाव, बी-बियाणांवर अनुदान तसेच सर्वसामान्य जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये शेतकर्‍यांनी चक्क ट्रॅक्टर, पेरणी यंत्र घेऊन रस्त्यावर ठिय्या मांडला. आंदोलनात भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांसह शेतकर्‍यांनी जोरदार घोषणा दिल्या.
आमदार कैलास पाटील म्हणाले, महाराष्ट्रासह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली तरी देखील या सरकारने शेतकर्‍यांची कसलीही दखल घेतली नाही. उलट जाती-जातीमध्ये भांडणे लावून देण्याचे काम हे सरकार करीत असल्याचे पाटील म्हणाले. तसेच शेतकर्‍यांना कर्जमुक्ती, शेतकरी सन्मान योजनेतून 15 हजार रुपये, लाडक्या बहिणींना दिडहजार रुपयावरुन 2100 रुपये, 45 हजार गावात पाणंद रस्ते, शेतकर्‍यांनी खरेदी केलेल्या खतावरील राज्य सरकारची जीएसटी अनुदानाच्या स्वरुपात परत करण्याबरोबर एक रुपयांत पीकविमा, वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये देण्याचा शब्द सरकारने पाळला नाही. शेतीला 24 तास वीज पुरवठा, शेतीमालाला हमीभाव, खते व बी-बियाणांचे दर नियंत्रित ठेवणे यासारख्या हजारो घोषणांचा पाऊस पाडणार्‍या सरकारने एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे जनता तुम्हाला माफ करणार नाही. आश्वासनाची पूर्तता न झाल्यास तुम्हाला रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशारा आमदार पाटील यांनी दिला.

आंदोलनात सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर,भारत इंगळे,महिला आघाडी शामल वडणे, मनीषा वाघमारे,जिल्हा संघटक दीपक जवळगे, दिलीप पाटील,शिवसेना सचिव प्रवीण कोकाटे, मा. नगराध्यक्ष दत्ता बंडगर,उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते,प्रदीप मेटे,जितेंद्र कानडे तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, जग्गनाथ गवळी, सचिन काळे,अमोल बिराजदार शहरप्रमुख सोमनाथ गुरव, राहुल खपले,विश्वजीत जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे,मनोहर धोंगडे, दिनेश बंडगर,संग्राम देशमुख, शाम जाधव, राजेश्वर पाटील संजय खडके , नगरसेवक राजाभाऊ पवार,राणा बनसोडे, तुषार निंबाळकर सिद्धेश्वर कोळी, गणेश खोचरे,पंकज पाटील,राकेश सूर्यवंशी, अभिराज कदम, बंडू आदरकर, पांडुरंग माने, वैभव वीर, संतोष पुदाले, मोईन पठाण, संजय खडके, नाना गरड,मनोज पडवळ, सह्याद्री राजेनिंबाळकर, अजिंक्य राजेनिंबाळकर, गफुर् शेख, शोकत शेख,जगदीश शिंदे, संदीप शिंदे, अजित बाकले,गणेश साळुंके, मिलिंद पेठे, अभिजित देशमुख, संदीप शिंदे, संजय बाबा देशमुख,विशाल जमाले,वैभव वीर, पांडुरंग माने,शिवाजी देशमुख, कृष्णा मोरे, बाळकृष्ण पाटील, dr कानडे सर,मंगेश काटे,अक्षय खळदकर,पंडित देशमुख, गोविंद चौधरी, मेघराज मुंडे,अबरार कुरेशी, अक्षय जोगदंड,सतीश लोंढे, प्रदीप साळुंके, परवेज भाई,प्रशांत जगताप, हनुमंत देवकते, पांडू भोसले,प्रवीण केसकर,अविनाश शेरखाने, कलीम कुरेशी, असद रजवी, अण्णा तनमोर, शाम नाना खबाले, आण्णा दूधभाते,प्रथ्वीराज खोचरे,सरदारसिंग ठाकूर, नवनाथ जगताप, अनमोल साळुंके चेतन बंडगर, मनोज पडवळ, मारुती देशमुख,मनोज मगर, महेश मगर,दिनेश हेड्डा,अंकुश मोरे, बळीराम कांबळे, आश्रुबा बिक्कड,विकास जाधव,छोटा साजिद,अबरार कुरेशी, किसन भिसे,नवनाथ तवले, शाकीर शेख, रामेश्वर जमाले, सुनील शेळके,निर्भय घुले,कुलदीप घावटे,संदीप शिंदे शिवसैनिक व शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.

संबंधित बातम्या

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
ग्रामीण

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न

July 2, 2025
धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
क्राइम

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

June 30, 2025
धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
अर्थव्यवस्था

धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

June 27, 2025
खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
आरोग्य

खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा

June 26, 2025
ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
क्राइम

ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले

June 16, 2025
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा
क्राइम

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

June 13, 2025

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
  • धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
  • धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
  • खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
  • ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!