पारगाव – दि.25 ऑगस्ट रोजी वाशी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नती अभियान अंतर्गत पारगाव ,पारा, तेरखेडा प्रभागसंघ अंतर्गत लखपती दीदी कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात ज्या महिलांनी बचत गटामध्ये भाग घेऊन आपली आर्थिक स्थिती उंचावली आहे व बचत गटाच्या मदतीने तिचे आर्थिक उत्पन्न हे वार्षिक एक लाखापेक्षा जास्त झालेले आहे. अशा महिलांची निवड या योजनेमध्ये केलेली आहे. तालुक्यातील सहाशे महिलांची निवड या लखपती दीदी योजनेमध्ये केलेली आहे या सर्व सहाशे महिलांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.अशा लखपती दीदी ना प्रमाणपत्र देऊन गैरविण्यात आले.या कार्यक्रमास शिवसेना वाशी पं.स.सदस्य सविता विकास तळेकर, पारगावचे सरपंच महेश कोळी,तालुका अभियान कक्षाचे रवी कुमार ढाकणे,अशोक बांगर,या सर्वांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी पारगाव येथील कार्यक्रमांमध्ये पारगाव विभागातील शेकडो महिला या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी अशोक बांगर यांनी या लखपती दीदी योजनेबद्दल व बचत गटामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवून आपली प्रगती साधावी असे आवाहन केले.