धाराशिव – महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू असून या कालावधीमध्ये शिवसेना उध्दव़ बाळासाहेब ठाकरे पक्षा मार्फत जाहीर करण्यात आलेल्या उमेदवाराच्या विरोधात वक्तव्य़ सोशल मीडीया द्वारे केल्याबद्दल सुरेश वाले उपजिल्हाप्रमुख शिवसेना उध्दव़ बाळासाहेब ठाकरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
पक्ष विरोधी काम केल्यामुळे धाराशिव उपजिल्हाप्रमुख सुरेश वाले यांच्यावर कारवाई केली असून अशी कारवाई धाराशिव जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये पहिल्यांदाच केल्यामुळे पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना अप्रत्यक्ष पक्षाने सुचवात केले असे या कारवाई मधून दिसून येत आहे. विधानसभेचे निवडणूक सध्या सुरू असून अशा काळामध्ये पक्षाबरोबर कार्यकर्ता असो किंवा पदाधिकार असो राहणे अपेक्षित असते परंतु निवडणुकीच्या दरम्यान पक्षाच्या उमेदवाराबद्दल सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने जर पोस्ट टाकत असेल तर पक्ष हा अशा पद्धतीने कारवाई करू शकतो या कारवाईतून असे दिसून येत आहे.
अधिक अपडेट्ससाठी आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करा
भविष्यात कुठल्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने पक्ष विरोधी काम केले तर त्यांना तो तो पक्ष अशा पद्धतीने कारवाई करू शकतो हे या कारवाईतून दिसून येत आहे.